हशू अडवाणी विद्यालयाच्या पाच कुस्तीपटूंची जिल्हास्तरावर निवड; विद्यालयातर्फे विशेष सत्कार


राशीन (प्रतिनिधी : जावेद काझी): येथील समाज विकास संस्था संचलित हशू अडवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील पाच गुणवंत कुस्तीपटूंची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल गुरुवारी (दि. १७ सप्टेंबर) विद्यालयाच्या वतीने त्यांचा विशेष नागरी सत्कार करण्यात आला. या यशामुळे संपूर्ण राशीन परिसरातून खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
शालेय कुस्ती स्पर्धेत हशू अडवाणी विद्यालयाच्या मल्लांनी चमकदार कामगिरी करत जिल्हास्तराचे तिकीट मिळवले. विविध वयोगटांत निवड झालेल्या कुस्तीपटूंची नावे खालीलप्रमाणे आहेत:

१७ वर्षे वयोगट: कार्तिक भाऊसाहेब मोहिते, हर्षद रामदास काळे
१९ वर्षे वयोगट: राम ज्ञानदेव मोहिते, ऋतुराज शरद जानभरे, संग्रामराजे विश्वास मोढले
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल समाज विकास संस्थेचे अध्यक्ष अल्लाउद्दीन काझी, प्राचार्य राजेंद्र नष्टे, क्रीडा शिक्षक आजिनाथ शिंदे, संकेत आजबे, शेलार सर यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विजयी कुस्तीगिरांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या...




