श्री जगदंबा देवी देवस्थान जमिनीतून गौणखनिजाची चोरी करणाऱ्यावर व छुपीसाथ देणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा. रवींद्र दामोदरे.


राशीन (प्रतिनिधी: जावेद काझी):
मौजे राशीन (ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) येथील गट नंबर १४५८/१ या श्री जगदंबा देवस्थानच्या मालकीच्या जमिनीतून बेकायदेशीरपणे मुरूम मातीची तस्करी व चोरी करणाऱ्या ८ संशयितांवर तसेच या गुन्हेगारांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र तुकाराम दामोदरे यांनी केली आहे.
रवींद्र दामोदरे यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालय, कर्जत येथे लेखी तक्रार निवेदन सादर केले आहे.
तक्रारीतील मुख्य मुद्दे व मागण्या:
गौण खनिज चोरीचा आरोप: श्री जगदंबा देवस्थानच्या गट क्र. १४५८/१ मधील जमिनीतून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीरपणे मुरूम व मातीची चोरी आणि तस्करी सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

अधिकाऱ्यांवर संगनमताचा संशय: या प्रकरणी निवेदने देऊनही कारवाई न केल्याने कर्जतचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तसेच राशीनचे मंडळ अधिकारी श्री. राठोड आणि गाव कामगार तलाठी श्री. सुपेकर यांच्यावर गुन्हेगारांना पाठीशी घातल्याचा व अकार्यक्षमतेचा आरोप करण्यात आला आहे.
निलंबन व SIT चौकशीची मागणी: संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बेकायदेशीर मालमत्तेची ‘एसआयटी’ (SIT) मार्फत चौकशी करण्यात यावी आणि महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम ३ चे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना तात्काळ निलंबित करून विभागीय चौकशी सुरू करावी.
याप्रकरणी ९ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांना, तर ११ सप्टेंबर २०२६ रोजी तहसील व उपविभागीय कार्यालय कर्जत येथे अधिकृत आवक-जावकद्वारे निवेदन सादर करण्यात आले आहे…




