google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

अहिल्यानगर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी; शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या

Samrudhakarjat
5 0 5 2 4 0

कर्जत  | प्रतिनिधी : अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकरी व पशुपालकांसमोर गंभीर संकट उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तातडीने दुष्काळ जाहीर करून चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी मानवी हक्क अभियानाच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

पावसाअभावी शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके धोक्यात आली असून, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात तातडीने चारा छावण्या सुरू कराव्यात, तसेच पाणीटंचाई असलेल्या गावांमध्ये पाण्याचे टँकर उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील शेतमजूर व कष्टकरी वर्गाच्या हाताला काम मिळत नसल्याने रोजगार हमी योजनेअंतर्गत तातडीने कामे सुरू करावीत, अशी मागणीही करण्यात आली आहे. पावसाअभावी पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दर हेक्टरी ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला स्थगिती द्यावी, पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, अशी मागणीही मानव हक्क अभियानाने केली आहे.

या मागण्यांसाठी चंद्रकांत डोलारे – जिल्हा कार्याध्यक्ष तथा जिल्हा संपर्क प्रमुख, मानवी हक्क अभियान, अहिल्यानगर, डॉ. राजेंद्र पवार – नगरसेवक, अ. नं. प. तथा सावित्री फुले शाहू आंबेडकर सेवाभावी संस्था, मिरजगाव, करण साळवे – जिल्हाध्यक्ष, मानवी हक्क अभियान, सहदेव चव्हाण – जिल्हा सचिव, मानवी हक्क अभियान आणि अशोकराव भोसले – जिल्हा संघटक, मानवी हक्क अभियान, अहिल्यानगर यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे.

दुष्काळी परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन शेतकरी, शेतमजूर आणि पशुधनाला तातडीने दिलासा देण्यासाठी शासनाने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी मानवी हक्क अभियानाच्या वतीने करण्यात आली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker