राशीन येथे अकोबा स्वामी पुण्यतिथी भक्तिमय वातावरणात साजरी


राशीन (प्रतिनिधी : जावेद काझी) : कर्जत तालुक्यातील राशीन येथे श्री अकोबा स्वामी भुजंग अय्या शेटे जंगम यांची पुण्यतिथी नुकतीच (रविवार, ९ ऑगस्ट) अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली.
यानिमित्त दुपारी १२ वाजता टाळ-मृदंग, ढोल-ताशांचा गजर आणि डीजेच्या सुमधुर स्वरांमध्ये अकोबा स्वामींची विधीवत पूजाअर्चा व महाआरती करण्यात आली. भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण परिसर स्वामीमयी झाला होता.
या धार्मिक सोहळ्याला श्री राम कानगुडे, शाहू राजे भोसले, शहाजीराजे भोसले, अशोक जंजिरे, डॉ. राजकुमार आंधळकर, सुभाष जाधव, आबा कानगुडे, शेखर सुरवसे, मोती महाराज सोनवणे, दीपक थोरात, विकी साळवे, दादासाहेब परदेशी, मालोजी राजे भिताडे, दिलीप दादा, बाबू शेठ देवगावकर, सुभाष देवगावकर , दत्ता गोसावी, औदुंबर देवकर,यांच्यासह समस्त शेटे परिवार व राशीन ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेषतः महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

पूजा व महाआरतीच्या कार्यक्रमानंतर शेटे परिवाराच्या वतीने उपस्थित सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.




