मा.ना.डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाहणी दौऱ्याचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत!
कॅनल चारीच्या कामाची पाहणी, मंदिर दर्शन अन् कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


राशीन (प्रतिनिधी : जावेद काझी): जलसंपदा मंत्री (कृष्णा व गोदावरी खोरे विकास महामंडळ) तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री मा.ना.डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कर्जत तालुका पाहणी दौऱ्यादरम्यान ठिकठिकाणी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी त्यांचे अत्यंत जल्लोषात आणि भव्य स्वागत केले.
दौऱ्यातील प्रमुख ठळक मुद्दे: खेड येथे स्वागत: भिगवण येथून आगमन होताच खेड येथे कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नामदार साहेबांचे स्वागत केले.
राशीन येथे भव्य स्वागत व पूजा: राशीन शहरात भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) व आठवले गटाच्या कार्यकर्त्यांसह हजारो तरुणांनी हलगीच्या तालावर अन् फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत केले.

याप्रसंगी प्रसिद्ध श्री जगदंबा मंदिरात ना. विखे पाटील यांच्या हस्ते जगदंबा मातेची पूजा करण्यात आली. जगदंबा देवी पब्लिक ट्रस्ट, पुजारी व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.

चिलवडी व बेनवडी चौकात जल्लोष: चिलवडी गावातील मुख्य चौकात आणि बेनवडी चौकात भाजप व ग्रामस्थांच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले.
१.५ कोटींच्या दुरुस्ती कामाची पाहणी: गेल्या वर्षी अवकाळी पावसामुळे कर्जत तालुक्यातील होलेवाडी येथील कॅनल चारीचे मोठे नुकसान झाले होते. ना. विखे पाटील यांनी तात्काळ दीड कोटी रुपये मंजूर करून अवघ्या एका महिन्यात हे काम पूर्ण करून घेतले. या दुरुस्त झालेल्या कामाची प्रत्यक्ष पाहणी त्यांनी केली.
वकील संघटनेतर्फे सत्कार: कर्जत शहरात नव्याने अतिरिक्त जिल्हा न्यायालय व आवश्यक पदभरतीस मंजुरी दिल्याबद्दल कर्जत तालुका वकील संघटनेच्या वतीने नामदार साहेबांचा विशेष नागरी सत्कार करण्यात आला.
या पाहणी दौऱ्यात जिल्हा बँक संचालक अंबादास पिसाळ, शहाजीराजे भोसले, विक्रमसिंह राजेभोसले, दादासाहेब सोनमाळी, संग्राम पाटील, डॉ. विनायक जगताप, कल्याण नवले, सरपंच राजेंद्र हीरभगत, किशोर मोडले, राहुल सरकाळे, संभाजी लोंढे, अॅड. बाळासाहेब शिंदे, सोमनाथ शिंदे (शिवसेना तालुकाध्यक्ष), निळकंठराव देशमुख, पांडुरंग भंडारे (भाजप तालुकाध्यक्ष), सुनील काळे, दत्तात्रय गोसावी, शिवाजी काळे (राशीन शहराध्यक्ष), अॅड. प्रतिभाताई रेणुका (महिला अध्यक्ष भाजप), तात्यासाहेब माने (भाजपा प्रदेश सदस्य), सोएब काझी (प्रदेश अल्पसंख्यांक उपाध्यक्ष), डॉ. विलास राऊत, प्रवीणशेठ आंधळकर, अमोल शेटे यांसह जलसंपदा विभागाचे राज्यस्तरीय अधिकारी, महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या समस्यांवर आढावा बैठक:
दौऱ्याच्या शेवटी कर्जत येथे शासकीय अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विशेष आढावा बैठक पार पडली. यामध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न आणि स्थानिक समस्या जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश देऊन शेतकऱ्यांचे, व्यापारी दुकानदार व इतर ग्रामस्थांचे प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याचे आदेश ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.



