google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

पर्यावरण संवर्धनातील उल्लेखनीय कार्याचा सकल मराठा समाजाला कडून गौरव

Samrudhakarjat
4 9 2 9 4 9

कर्जत | प्रतिनिधी :- पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, स्वच्छता अभियान तसेच समाजहिताच्या विविध उपक्रमांमध्ये उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल सर्व सामाजिक संघटना, कर्जत यांचा सकल मराठा समाज, कर्जत यांच्या वतीने सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. महाराष्ट्र शासनाचा ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार–२०२४’ प्राप्त झाल्याबद्दल हा सन्मान प्रदान करण्यात आला.

यावेळी सकल मराठा समाजाचे समन्वयक शिवश्री रावसाहेब धांडे यांनी सांगितले की, “पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असून समाजहितासाठी निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींना प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे. सर्व सामाजिक संघटनेने वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, स्वच्छता व सामाजिक उपक्रमांत केलेले कार्य संपूर्ण कर्जत तालुक्यासाठी प्रेरणादायी आहे. अशा कार्यकर्त्यांचा गौरव करणे ही समाजाची जबाबदारी असून, यामुळे इतरांनाही समाजसेवा व पर्यावरण संवर्धनासाठी प्रेरणा मिळेल.”

सन्मानपत्रातही संघटनेच्या पर्यावरण संरक्षण व समाजसेवेतील अविरत, निस्वार्थ आणि आदर्श कार्याचा गौरव करण्यात आला असून, भविष्यातही ही चळवळ अधिक व्यापक व्हावी आणि समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबवावेत, अशा शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.

यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने सर्व सामाजिक संघटना, कर्जत यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील सामाजिक व पर्यावरणपूरक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker