google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

विठ्ठल नामाच्या गजरात पिंक पेटल क्युरियस किड्सची बाल दिंडी; कर्जत शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले!

Samrudhakarjat
4 9 2 9 1 7

कर्जत प्रतिनिधी :- आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर कर्जत येथील पिंक पेटल क्युरियस किड्स प्री-प्रायमरी स्कूल यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला भव्य बाल दिंडी सोहळा भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात संपन्न झाला. “जय जय राम कृष्ण हरी” तसेच “ज्ञानोबा माऊली तुकाराम” च्या अखंड जयघोषात, टाळ-मृदुंगाच्या निनादात विठ्ठल-रुक्मिणीच्या पालखीला खांदा देत चिमुकल्यांनी दिंडीची सुरुवात केली.

या दिंडीत विद्यार्थ्यांनी भगवान विठ्ठल, माता रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत मुक्ताबाई यांसह विविध संतांच्या आकर्षक वेशभूषेत सहभाग घेत वारकरी परंपरेचे सुंदर दर्शन घडविले. हातात भगवे ध्वज, डोक्यावर तुळशीवृंदावन, मुखी विठ्ठल नामाचा गजर आणि टाळ-चिपळ्यांच्या गजरात चिमुकल्यांनी परिसर भक्तिमय केला. विद्यार्थ्यांच्या उत्साहपूर्ण सहभागामुळे उपस्थित पालक आणि नागरिक भारावून गेले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जुलेखा सय्यद मॅडम यांनी केले. यावेळी प्रणव भैलुमे, निखिल जगदणे, ॲड. शिंदे, बापूसाहेब नेटके, बाळासाहेब साळुंखे, डॉ. पवार, डॉ. निकिता नेटके यांच्यासह मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. महिला पालकांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची आरती करण्यात आली.

यावेळी मुख्याध्यापिका जुलेखा सय्यद मॅडम आपल्या मनोगतात म्हणाल्या, “बालपणापासून मुलांमध्ये संतांचे विचार, वारकरी परंपरेबद्दल आदर, भारतीय संस्कृतीची ओळख आणि सामाजिक मूल्ये रुजावीत, हा या दिंडी सोहळ्यामागील मुख्य उद्देश आहे. शिक्षणासोबत संस्कारही तितकेच महत्त्वाचे आहेत. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये भक्ती, शिस्त, एकता आणि संस्कृतीप्रती अभिमान निर्माण होतो.”

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग आणि सर्व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. या भक्तिमय बाल दिंडीचे उपस्थितांनी भरभरून कौतुक केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker