साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना राशीनमध्ये विनम्र अभिवादन; १०६ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी


राशीन (प्रतिनिधी : जावेद काझी) : लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती राशीन येथील साठे चौकात मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि मान्यवरांनी एकत्र येत अण्णाभाऊंच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करत त्यांना विनम्र अभिवादन केले.
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून शाहूराजे राजेभोसले, शंकर देशमुख, विजय नाना मोढळे, पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक चव्हाण साहेब, भीमराव साळवे, मालोजी राजे भिताडे, डॉ. विलास राऊत, तात्यासाहेब माने, दत्ता आबा गोसावी, अशोक जंजिरे, शिवाजी काळे, भास्कर मोढळे, सुभाष जाधव, रवींद्र दामोदरे, सोयब काझी, दीपक थोरात, अमोल शेटे, जितेंद्र शेटे, राजेंद्र ढावरे, दादा परदेशी, अमोल जाधव आणि कुंडलिक सायकर यांसह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते…

कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्ता उकीरडे यांनी केले. त्यांनी आपल्या मनोगतातून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या विचार आणि साहित्याचा गौरव केला. तर कार्यक्रमाच्या शेवटी मातंग एकता आंदोलन राशीन शहराध्यक्ष संतोष ढावरे यांनी उपस्थितांचे आणि सर्व मान्यवरांचे आभार मानले.



