google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

कर्जत तालुक्यातील निमगाव डाकूच्या तुषार सुतारांची CISF महासंचालकांच्या प्रशंसा पदकासाठी निवड

Samrudhakarjat
4 9 8 9 9 9

 

कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. कैलासवासी पोपट सीताराम सुतार यांनी CISFमध्ये पोलीस निरीक्षक म्हणून बजावलेल्या देशसेवेचा वारसा त्यांचे सुपुत्र तुषार पोपट सुतार यांनी पुढे नेत राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. CISFमधील समर्पित व प्रशंसनीय सेवेसाठी तुषार सुतार यांची CISF महासंचालकांचे प्रशंसा पदक – कांस्य व प्रशस्तीपत्र या विशेष सन्मानासाठी निवड झाली आहे.

२८ ऑगस्ट २०२६ रोजी CISF मुख्यालय, नवी दिल्ली यांच्याकडून या सन्मानासाठी तुषार सुतार यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली. CISFमधील सुमारे २.२० लाख कर्मचाऱ्यांपैकी देशभरातून केवळ ३०० कर्मचाऱ्यांची या विशेष सन्मानासाठी निवड झाली असून, त्यामध्ये कर्जत तालुक्यातील निमगाव डाकूचे सुपुत्र तुषार सुतार यांचा समावेश आहे. त्यामुळे त्यांच्या या यशाने गावासह संपूर्ण कर्जत तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

तुषार यांचे वडील कैलासवासी पोपट सीताराम सुतार यांनी CISFमध्ये पोलीस निरीक्षक म्हणून दीर्घकाळ सेवा बजावली. सेवेतून निवृत्त झाल्यानंतरही त्यांनी समाजसेवेच्या माध्यमातून आपले योगदान सुरू ठेवले. वडिलांनी देशसेवेत रुजविलेली मूल्ये आणि कर्तव्यनिष्ठेचा वारसा तुषार यांनी आत्मसात करत CISFमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली.

विशेष म्हणजे, पोपट सुतार यांच्या तीनही सुपुत्रांनी देशसेवेचा मार्ग स्वीकारला आहे. मोठे सुपुत्र संतोष पोपट सुतार इंडियन नेव्हीमध्ये, दुसरे सुपुत्र प्रवीण पोपट सुतार महाराष्ट्र पोलीस दलात, तर तिसरे सुपुत्र तुषार पोपट सुतार CISFमध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे एका कुटुंबातील तीन सुपुत्रांकडून देशाच्या सुरक्षाव्यवस्थेत सेवा बजावली जात असल्याने सुतार कुटुंबाची ही देशसेवेची परंपरा विशेष कौतुकास्पद ठरत आहे.

निमगाव डाकूच्या मातीतून देशसेवेची प्रेरणा घेतलेल्या तुषार सुतारांना मिळालेला हा राष्ट्रीय सन्मान केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर कर्जत तालुक्यासाठीही अभिमानाचा क्षण ठरला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ग्रामस्थ, नातेवाईक, मित्रपरिवार आणि सहकाऱ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे….

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker