google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
आरोग्य व शिक्षणब्रेकिंग

कर्जतच्या मातीची जपानपर्यंत भरारी; मयूर काळदाते यांची अभ्यास दौऱ्यासाठी निवड

चिंचोली काळदातच्या गुणवत्तेला नवी ओळख; तंत्रज्ञान, संशोधन व जपानी कार्यसंस्कृतीचा करणार प्रत्यक्ष अभ्यास

Samrudhakarjat
4 9 9 2 9 2

कर्जत : कर्जत-जामखेड मतदारसंघातील चिंचोली काळदात (ता. कर्जत) येथील मयूर दिलीप काळदाते यांची जपान अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे. येत्या ९ ते १३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत हा दौरा होणार आहे. तंत्रज्ञान, संशोधन, शिस्त, नियोजन आणि कार्यक्षमतेसाठी जगभरात आदर्श मानल्या जाणाऱ्या जपानच्या कार्यपद्धतीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी काळदाते यांना मिळणार आहे.

जपानमधील अत्याधुनिक तंत्रज्ञान, संशोधनातील प्रगती, उद्योग-व्यवस्थापनातील नियोजन, शिस्तबद्ध कार्यसंस्कृती तसेच बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याच्या पद्धतींचा या दौऱ्यात अभ्यास केला जाणार आहे. या अनुभवाचा उपयोग भविष्यातील व्यावसायिक तसेच सामाजिक कार्यात करण्याचा मानस मयूर काळदाते यांनी व्यक्त केला आहे…

या निवडीबद्दल महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी शुभेच्छा देत अभिनंदन केले आहे. तसेच आमदार रोहित पवार यांनीही मयूर काळदाते यांच्या निवडीचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, विधान परिषद सदस्य सत्यजित तांबे यांनी २६ ऑगस्ट रोजी मयूर काळदाते यांना पत्र पाठवून विशेष शुभेच्छा दिल्या. जपानसारख्या तंत्रज्ञान, संशोधन, शिस्त आणि कार्यसंस्कृतीचा आदर्श असलेल्या देशाचा अभ्यास करण्याची संधी ही त्यांच्या कर्तृत्वाची, जिद्दीची आणि गुणवत्तेची अभिमानास्पद पावती असल्याचे तांबे यांनी पत्रात नमूद केले आहे.

या दौऱ्यातून मिळणारे ज्ञान, अनुभव आणि प्रेरणा व्यक्तिमत्त्व व कार्यक्षमता अधिक समृद्ध करण्यास निश्चितच उपयुक्त ठरेल. ही निवड केवळ मयूर काळदाते यांच्यासाठीच नव्हे, तर काळदाते कुटुंब, चिंचोली काळदात आणि कर्जत तालुक्यासाठीही अभिमानाची बाब ठरली आहे.

मयूर काळदाते यांच्या निवडीचे वृत्त समजताच चिंचोली काळदातसह कर्जत तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, जपान अभ्यास दौऱ्यासाठी विविध स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

चिंचोली काळदातच्या मातीतून जपानपर्यंत पोहोचलेली ही भरारी कर्जतच्या युवा गुणवत्तेची नवी ओळख निर्माण करणारी ठरली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker