google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

राशीन नगरीत ‘हर हर महादेव’चा गजर: श्री काशीविश्वेश्वर रथयात्रा प्रचंड उत्साहात पार

Samrudhakarjat
5 0 0 4 7 4

राशीन प्रतिनिधी जावेद काझी. :- कर्जत तालुक्यातील ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेल्या राशीन नगरीत सालाबादप्रमाणे यंदाही श्री काशीविश्वेश्वर व श्री भगवान महाविष्णू रथयात्रा अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात पार पडली. ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने संपूर्ण राशीन नगरी दुमदुमून गेली होती.

दुपारी दोनच्या सुमारास रथाची पारंपरिक महापूजा सत्यपुरुष आखोबा स्वामी यांच्या घराण्याचे वंशज श्री. अक्षय शेटे व सौ. पायल शेटे यांच्या शुभहस्ते शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात आली. पूजेनंतर लागलीच रथ ग्रामप्रदक्षिणेसाठी मार्गस्थ झाला. रथाच्या पुढे ढोल-ताशांचा गजर, बँजो पथके आणि भव्य फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली होती.

रथाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची रीघ

ग्रामप्रदक्षिणेदरम्यान राशीन व परिसरातील हजारो भाविकांनी रथाचे दर्शन घेऊन पुण्यलाभ घेतला. यात्रेत महिला वर्ग आणि लहान मुलांचा मोठा सहभाग दिसून आला.

यात्रेतील मुख्य आकर्षणे

यात्रेच्या निमित्ताने बालगोपाळांसाठी ‘मौत का कुवा’, लहान-मोठे पाळणे आणि विविध खेळण्यांचे स्टॉल्स उभारण्यात आले होते. याशिवाय, विविध प्रकारच्या मिठाईची दुकाने, खेळणी आणि स्टेशनरीच्या दुकानांनी बाजारपेठ सजली होती…

प्रमुख मान्यवरांची उपस्थिती

या सोहळ्यासाठी शंकर देशमुख, शाहूराजे राजेभोसले, पै. शामभाऊ कानगुडे, राजेंद्र देशमुख, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, शहाजीराजे राजेभोसले, विजय नाना मोढळे, मंडळ अधिकारी राठोड, भीमराव साळवे, अशोक जंजिरे, दादासाहेब परदेशी, विक्रमसिंह राजेभोसले, रामकिसन साळवे, सुभाष देवगावकर, औदुंबर देवगावकर, दिलीप दादा, ज्ञानेश्वर भागवत, अभिजीत भागवत, विनोद शेठ राऊत, प्रवीण शेठ आंधळकर, दत्तात्रय गोसावी, गणेश कदम, पांडुरंग भंडारे, मालोजीराजे भिताडे, राजेंद्र राऊत, सुनील गडगळ, धनंजय मोढळे, राजेंद्र डोरले, इलाही पठाण, बाळासाहेब कदम, अशोक राऊत तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) अशोक काटे साहेब उपस्थित होते.

याशिवाय रथाचे सेवेकरी शिवदास शेटे, महेश शेटे, अमोल शेटे, प्रफुल्ल स्वामी पखाले यांच्यासह राशीन परिसरातील नागरिक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सायंकाळी उशिरापर्यंत सुरू असलेल्या या यात्रेमुळे राशीन नगरीत अभूतपूर्व उत्साह आणि भक्तीचे वातावरण पाहावयास मिळाले…

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker