google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

कर्जत तालुका पोल्ट्री असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. संदीप बरबडे

पोल्ट्री व्यावसायिकांच्या १० ज्वलंत प्रश्नांवर लढा; नवीन कार्यकारिणीचा कृती आराखडा जाहीर

Samrudhakarjat
4 8 9 6 0 4

(कर्जत | प्रतिनिधी) :- तालुक्यातील पोल्ट्री व्यावसायिकांना गेल्या काही वर्षांपासून लिफ्टिंग, कंपन्यांची मनमानी, वाढलेला उत्पादन खर्च, वीज समस्या आणि सरकारी योजनांच्या अभावामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर पोल्ट्री व्यावसायिकांच्या हक्कासाठी स्थापन झालेल्या कर्जत तालुका पोल्ट्री असोसिएशनच्या नवीन कार्यकारिणीची निवड रविवारी (५ जुलै) हॉटेल साई येथे एकमताने करण्यात आली. या निवडीत डॉ. संदीप बरबडे यांची अध्यक्षपदी, अण्णासाहेब भोसले यांची उपाध्यक्षपदी, किरण भैलुमे यांची सचिवपदी आणि शैलेश गुंड यांची खजिनदारपदी निवड झाली.

निवडीनंतर बोलताना अध्यक्ष डॉ. संदीप बरबडे यांनी, “पोल्ट्री व्यवसाय हा केवळ उद्योग नसून हजारो शेतकरी कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा आधार आहे. कंपन्यांची मनमानी, लिफ्टिंगचा प्रश्न, भावातील चढ-उतार आणि सरकारी धोरणांमुळे व्यावसायिक भरडले जात आहेत. आता सर्वांनी एकत्र येऊन आपल्या हक्कासाठी संघटितपणे लढा देण्याची वेळ आली आहे,” असे स्पष्ट केले.

बैठकीत पोल्ट्री व्यावसायिकांनी लिफ्टिंगचा प्रश्न, कंपन्यांकडून होणारी दंड आकारणी, चिक व फीडच्या वाढलेल्या किंमती, कोंबडी खताचे घसरलेले दर, वीज दरवाढ व लोडशेडिंग, विमा व सरकारी योजनांचा अभाव, औषधे व लसींच्या वाढलेल्या किमती, बँक कर्जाचा ताण, परवाने व एनओसीसाठी होणारा विलंब तसेच रोगराई व बाजारातील अस्थिरता अशा दहा प्रमुख समस्यांवर सविस्तर चर्चा केली.

या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी कंपन्यांशी सामूहिक चर्चा, खत विक्रीसाठी स्वतंत्र मार्केटिंग सेल, पोल्ट्रीला शेतीचा दर्जा व वीज सवलतीसाठी शासनाकडे पाठपुरावा तसेच दर महिन्याला नियमित बैठका घेण्याचा निर्णय नव्या कार्यकारिणीने घेतला. लवकरच जिल्हाधिकारी आणि संबंधित कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसमोर मागण्यांचे निवेदन सादर करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

उपाध्यक्ष अण्णासाहेब भोसले यांनी, “तालुक्यातील कोणताही पोल्ट्री फार्मर आता एकटा राहणार नाही. प्रत्येक व्यावसायिकाच्या पाठीशी असोसिएशन खंबीरपणे उभी राहील,” असा विश्वास व्यक्त केला. सचिव किरण भैलुमे यांनी प्रास्ताविक केले, तर खजिनदार शैलेश गुंड यांनी आभार मानले. बैठकीस नितीन तोरडमल, प्रफुल्ल बरबडे, सागर भैलुमे, संदीप धोदाड, परमेश्वर मोहिते, आजिनाथ पठाडे, प्रदीप मांडगे, रावसाहेब शिंदे, वैभव सुद्रिक, ओंकार लागोरे, भूषण जगताप, रवींद्र नेवसे, रोहन राऊत, विजय गुंड यांच्यासह तालुक्यातील मोठ्या संख्येने पोल्ट्री व्यावसायिक उपस्थित होते.

◆ पोल्ट्री व्यावसायिकांच्या १० प्रमुख समस्या चर्चेत • लिफ्टिंगचा प्रश्न • कंपन्यांची मनमानी दंड आकारणी • चिक व फीडच्या वाढलेल्या किंमती • कोंबडी खताला कमी दर • वीज दरवाढ व लोडशेडिंग • विमा व सरकारी योजनांचा अभाव • औषधे व लसी महाग • बँक कर्जाचा वाढता ताण • परवाने व NOC मधील अडथळे • रोगराई व बाजारातील अस्थिरता ◆ नवीन कार्यकारिणीचे चार प्रमुख निर्णय ✔ कंपन्यांशी सामूहिक चर्चा ✔ खत विक्रीसाठी मार्केटिंग सेल ✔ पोल्ट्रीला शेतीचा दर्जा व वीज सवलतीसाठी शासनाकडे पाठपुरावा ✔ दर महिन्याला नि यमित बैठक व समस्या निवारण

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker