राशीनमध्ये ‘विशेष सखोल पुनर्नरीक्षण’ (SIR) कार्यक्रमाला सुरुवात; मतदारांनी कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन


राशीन (प्रतिनिधी – जावेद काझी):
राशीन गावातील सर्व मतदार बंधू-भगिनींसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आवश्यक सूचना आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, दि. ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत गावात ‘विशेष सखोल पुनर्नरीक्षण’ (SIR) कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेअंतर्गत प्रत्येक मतदाराचे दोन महत्त्वाचे फॉर्म भरून घेतले जाणार आहेत. यासाठी गावातील प्रत्येक वार्डातील बी.एल.ओ. (BLO) कार्यरत झाले आहेत. प्रत्येक कुटुंबप्रमुखांनी आपल्या घरातील सर्व पात्र सदस्यांची आवश्यक कागदपत्रे तातडीने तयार ठेवून आपल्या संबंधित बी.एल.ओ. यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आवश्यक कागदपत्रे:
मतदार यादीतील नाव निश्चितीसाठी खालील कागदपत्रे जमा करणे बंधनकारक आहे: १) दोन कलर फोटो २) आधार कार्ड झेरॉक्स ३) मतदान कार्ड झेरॉक्स

सर्व मतदारांनी कृपया याची गंभीर दखल घ्यावी की, जर ही आवश्यक कागदपत्रे विहित मुदतीत (२९ जुलै २०२६ पर्यंत) जमा केली नाहीत, तर संबंधित मतदाराचे नाव मतदार यादीतून आपोआप कमी (वगळले) करण्यात येईल.
तरी राशीन गावातील सर्व नागरिकांनी कोणत्याही त्रुटी किंवा अडचणी टाळण्यासाठी वेळेत आपली कागदपत्रे जमा करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे नम्र आवाहन करण्यात आले आहे. सध्या हे काम प्राध्यापक विकी साळवे सर व आजिनाथ सानप सर हे फॉर्म भरताना राशीन गावात दिसत आहे. तरी राशीन व परिसरातील नागरिकांनी फॉर्म भरून प्रशासनाला मदत करावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.




