google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

जमिनीच्या वादाचे हिंसक रूप; वकीलाला बेदम मारहाण, मुलीशी गैरवर्तनाचा आरोप

भाजप तालुका सरचिटणीसासह सहा जणांवर POCSOसह गंभीर गुन्हा

Samrudhakarjat
4 8 6 6 7 3

कर्जत | प्रतिनिधी :- कर्जत तालुक्यातील कुंभेफळ येथे जमिनीच्या व्यवहार व ताब्याच्या वादातून एका वकील-शेतकऱ्यावर तलवार व काठ्यांनी जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची, तसेच त्यांना वाचवण्यासाठी धावून आलेल्या अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी भाजपचे तालुका सरचिटणीस तथा कुंभेफळचे माजी उपसरपंच चरपटीनाथ उर्फ पप्पूशेठ धोदाड यांच्यासह सहा जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) व पोक्सो कायद्यान्वये कर्जत पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, गट क्रमांक १७६ मधील जमिनीच्या व्यवहारावरून दोन्ही पक्षांमध्ये वाद सुरू असून, यापूर्वी फिर्यादीने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज दिला होता. तसेच साठेखताच्या आधारे खरेदीखत करून देण्याबाबत रजिस्टर नोटीसही पाठवली होती.

शनिवार (दि. २७ जून) रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास फिर्यादी आपल्या अल्पवयीन मुलीसह शेतात असताना सहा आरोपी तेथे आले. “जमिनीची नोटीस का पाठवली?” असा जाब विचारत आरोपींनी तलवार व काठ्यांनी फिर्यादीवर हल्ला केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून मोबाईलची तोडफोड करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

मारहाणीतून वडिलांची सुटका करण्यासाठी पुढे आलेल्या अल्पवयीन मुलीशी एका आरोपीने गैरवर्तन केल्याचा आरोप असून, दोन महिला आरोपींनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. आरडाओरडा ऐकून ग्रामस्थ घटनास्थळी धावून आल्यानंतर आरोपी तेथून पसार झाले. जखमी फिर्यादीने कर्जत उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

या प्रकरणी चरपटीनाथ पांडुरंग धोदाड, भाऊसाहेब पांडुरंग धोदाड, सुरज चरपटीनाथ धोदाड, धीरज चरपटीनाथ धोदाड, वैशाली चरपटीनाथ धोदाड आणि आश्विनी भाऊसाहेब धोदाड (सर्व रा. कुंभेफळ, ता. कर्जत) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमांसह पोक्सो कायद्याच्या कलम ८ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रमीज मुलानी करीत आहेत.

भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा; तालुक्यात चर्चेला उधाण

या प्रकरणातील प्रमुख आरोपी चरपटीनाथ उर्फ पप्पूशेठ धोदाड हे कुंभेफळ गावाचे माजी उपसरपंच असून सध्या भारतीय जनता पक्षाचे तालुका सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्यासह कुटुंबातील सदस्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाल्याने कर्जत तालुक्यात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker