मंथन सामान्य ज्ञान परीक्षेत घवघवीत यश; चि. आदर्श विशाल मेहेत्रे यांचा सत्कार

कर्जत, प्रतिनिधी : – मंथन सामान्य ज्ञान परीक्षा २०२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या चि. आदर्श विशाल मेहेत्रे यांचा काल अहिल्यानगर येथे आयोजित पारितोषिक वितरण व सत्कार समारंभात मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

चि. आदर्श याने इयत्ता चौथी गटात जिल्हा/विभाग स्तरावर चौथा क्रमांक तसेच राज्यस्तरावर नववा क्रमांक प्राप्त करून कर्जत तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल त्याला ट्रॉफी व प्रशस्तीपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

हा गौरव मा. श्री. राहुल शिर्के साहेब (सहाय्यक आयुक्त, अप्पर आयुक्त कार्यालय, ठाणे) यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी आदर्शने मान्यवरांकडून पुरस्कार स्वीकारला. हा क्षण त्याच्या कुटुंबीयांसाठी अत्यंत अभिमानास्पद ठरला.
आदर्शच्या या यशामागे त्याची मेहनत, नियमित अभ्यास, शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन तसेच पालकांचे प्रोत्साहन आणि सहकार्य महत्त्वाचे ठरले. त्याच्या या यशाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, मित्रपरिवार आणि नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.



