google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

शिवसेनेच्या कर्जत तालुका उपप्रमुख पदी दीपक थोरात यांची निवड

Samrudhakarjat
4 9 0 7 0 1

राशीन (प्रतिनिधी – जावेद काझी): – शिवसेना पक्षाच्या कर्जत तालुका उपप्रमुख पदी दीपक थोरात यांची अधिकृत निवड करण्यात आली आहे. शिवसेना तालुकाप्रमुख डॉ. नितीन तोरडमल यांच्या हस्ते दीपक थोरात यांना नियुक्तीचे पत्र देऊन त्यांच्यावर ही नवीन जबाबदारी सोपवण्यात आली.

या निवड सोहळ्याप्रसंगी बांधकाम कामगार सेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास जाधव, शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख विलास कानगुडे, बांधकाम कामगार सेनेचे जिल्हा उपप्रमुख चंदनसिंग रजपुत, जिल्हा सचिव महेश उकीरडे, तालुका उपप्रमुख सागर मासाळ आणि रवी जाधव यांसह पक्षाचे अनेक प्रमुख पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव: दीपक थोरात यांच्या या निवडीबद्दल राजकीय व सामाजिक स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. बांधकाम कामगार सेनेचे राज्य कार्याध्यक्ष संतोषभाऊ रजपुत, जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले, शिवसेना नेते संतोष काशिद, शहरप्रमुख नाझीम काझी आणि युवा नेते प्रसाद कानगुडे आदी मान्यवरांनी थोरात यांना फोनवरून व प्रत्यक्ष भेटून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व त्यांचे अभिनंदन केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker