Advertisement
आरोग्य व शिक्षणब्रेकिंग
Trending

कर्जत शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त प्रवीण दादा मित्र मंडळाच्या पुढाकाराने पाणी वाटप उपक्रम

Samrudhakarjat
4 1 1 0 5 4

कर्जत (प्रतिनिधी) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातून चौंडीला येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय होती या भाविकासाठी कर्जत शहर भारतीय जनता पार्टी व प्रवीणदादा घुले पाटील मित्र मंडळाच्या वतीने बिसलरी पाण्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाला भाविकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

या वेळी कर्जत नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ. रोहिणी घुले, नगरसेविका छाया शेलार, नगरसेविका ज्योती शेळके, नगरसेवक सतीश पाटील, सचिन घुले, आदित्य घुले, माजीद पठाण, कार्तिक पाटील, अमोल भगत आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी नगराध्यक्षा सौ. रोहिणी घुले म्हणाल्या, “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या “अहिल्यादेवी होळकर यांनी लोककल्याणाचा आदर्श घालून दिला. त्यांच्या जयंतीनिमित्त भाविकांसाठी पाण्याचे वाटप करून त्यांचा संदेश प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न केला.”याचा आनंद वाटतो. भाविकांची सेवा करणे हेच खरे अहिल्यादेवींचे स्मरण आहे.”

तर नगरसेविका छाया शेलार म्हणाल्या, “

“पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी स्त्रीशक्तीचा आदर्श समाजापुढे ठेवला. त्यांनी केलेली समाजसेवा, न्यायनिष्ठा आणि लोककल्याणकारी कामे आजही प्रेरणादायी आहेत. हा उपक्रम ही आमची सामाजिक बांधिलकी दर्शवतो.”

या उपक्रमामुळे भाविकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, सामाजिक बांधिलकी जपत अशा उपक्रमांची अधिक गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker