pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

पारधी विकास कृती समितीच्या अमरण उपोषणाला मिळाले यश

Samrudhakarjat
4 6 1 4 6 5

राशीन (प्रतिनिधी): जावेद काझी. बारडगाव सुद्रिक ता. कर्जत जिल्हा अहिल्यानगर येथील रवींद्र गंडिशा काळे हे रहिवासी असून यांना घरकुल२०२० व २०२१ या कालावधीमध्ये मंजुरी झाले होते.आणि त्यांना १ हप्त्याची रक्कम त्याच्या खात्यावरती जमा झाली होती. आणि ते बारडगाव येथील राहत्या त्या जागेत घर बांधण्यासाठी सुरुवात केली. असल्यास पंचायत समितीने व स्थानिक राजकीय दबावाला बळी पडून तेथील काम थांबवले होते. आणि ते आदिवासी लोक आजही पाण्यात उन्हात व थंडीत गारठत आहे. तरीही प्रशासन याच्यामध्ये दखल घेत नव्हते.

पारधी विकास कृती समितीच्या वतीने सतत पाठपुरावा करूनही तेथील प्रश्न मार्गी लागत नसल्याने.आज पारधी विकास कृती समितीच्या वतीने गटविकास अधिकारी पंचायत समिती कार्यालय समोर कर्जत आमरण उपोषण करण्यात आले होते. व ते आज पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनी याची तात्काळ दखल घेऊन पंचायत समिती मधील काळे मॅडम, ग्रामसेवक व सर्कल यांच्यासोबत चर्चा केली तसेच बुधवारी सकाळी यांना सगळ्यांना घेऊन रवींद्र गंडिशा काळे यांच्या घरी पाहणी करून योग्य रिपोर्ट तयार करून सर्कल वन कमिटी ग्रामसेवक तलाठी सर्कल

यांना घेऊन ३० जून पर्यंत राहता त्या जागेचा पूर्ण जीआर व उतारा करून चौकशी करून कलेक्टर साहेबांना प्रस्ताव दाखल करून ती जागा घर बांधण्यास मंजुरी घेण्यास येईल. असे त्यांच्याकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले व हे सर्व न झाल्यास पुन्हा आंदोलनात करण्यात येईल. हे आमरण उपोषण पारधी विकास कृती समिती आयोजित व *एड. डॉ. अरुण आबा जाधव* यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण करण्यात आले. यावेळी उपस्थिती तुकाराम पवार, राहुल पवार, रवींद्र काळे, अश्विनी काळे, शीतल काळे,राजू पवार, तुषार पवार, आकाश काळे, उमेश काळे, शोकांतिका काळे, चंपा पवार, भाग्यश्री पवार, प्रियंका पवार, गणेश पवार, अविनाश काळे, ललिता काळे, गणेश काळे, राणी काळे, ओमकार काळे, अजिंक्य काळे, दिसेना पवार, सागर भोसले, लोचना भोसले, उल्हास भोसले,

या आंदोलनासाठी वेगवेगळ्या संघटना व पक्षातील लोकांनी पाठिंबा दर्शवला. सोमनाथ भैलुमे,दत्ता भालेराव, भारत आण्णा साळवे, लखन पारसे, वैजनाथ केसकर, संगीताताई केसकर (सरपंच). व इतर सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker