Advertisement
आरोग्य व शिक्षणब्रेकिंग

कर्जत तालुक्यात मोठी कारवाई : अवैध माती उत्खनन प्रकरणी 19.30 लाखांचा दंड!

Samrudhakarjat
4 1 1 4 1 5

 

कर्जत (प्रतिनिध) :- कर्जत तालुक्यातील कुळधरण येथील गट नंबर 217 हा भुलेश्वर मोहनीराज भिसे ,मुकुंद मोहनीराज भिसे, रत्नाकर मोहनीराज भिसे, शकुंतला मारुती काळाने यांचे नावे सामायिक क्षेत्र आहे. सदर क्षेत्र हे भिसे कुटुंबीय सुपे तालुका बारामती येथून ये जा करून शेती करतात. नेहमीप्रमाणे आपल्या शेतामध्ये आले

असता( 8 फेब्रुवारी 2025 रोजी) शेतातील मोठी ताल व बांधाची माती परस्पर नेल्याचे लक्षात आले. या घटनेनंतर त्यांनी कर्जत तहसीलदार,उपविभागीय अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली. तक्रारीच्या अनुषंगाने माननीय तहसीलदार यांनी चौकशी करून ठेकेदार एच.पी .भोसले( बेरडी)व शेतकरी अरुण अजिनाथ तांबे (कुळधरण)यांनी सुमारे 199. 80 ब्रास मातीचे अवैध रित्या वाहतूक आणि उत्खनन केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तहसीलदार साहेबांनी दोघांनाही नोटीस बजावून आपले म्हणणे सात दिवसात

उत्तरासह सादर करण्यास सांगण्यात आले, परंतु या दोघांनीही कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 48 च्या अधीन कारवाई करत तहसीलदार साहेबांनी दोघांवर प्रति ब्रास 600 रुपये दराने 1,19 ,880 रुपयांचा मूळ दंड आणि त्याची पाचपट म्हणजेच एकूण19लाख 30 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. हा दंड सात दिवसात भरावा अन्यथा ठेकेदार व संबंधित शेतकरी यांच्या मालमत्तेवर महसूल

विभाग बोजा चढवणार असल्याचे तातडीचे आदेश मान्य तहसीलदार साहेब यांनी दिलेले आहेत. या कारवाईचे सर्वसामान्य लोक स्वागत करीत आहेत. व तहसीलदार साहेबाना धन्यवाद देत आहेत.आता हा 19लाख 30हजार रुपयाचा बोजा ठेकेदार व संबंधित शेतकरी याच्या 7/12वर कधी चढवला जातोय याची सर्व लोक वाट पाहत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker