pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

राशिन मध्ये बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी. 

Samrudhakarjat
4 6 1 6 9 5

राशीन (प्रतिनिधी):- जावेद काझी.राशीन येथे मुस्लिम बांधवांनी बकरी ईदची नमाज सकाळी ८.३० वाजता मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. नमाज चे पठण मौलाना रहीम शेख यांनी केले. त्यावेळी कुर्बानी कशी करावी याबाबत मुस्लिम बांधवांना माहिती दिली.

त्यावेळी दुवाच्या रूपात हिंदू मुस्लिम ऐक्य राहू दे, भाईचारा अबाधित राहू दे, शेतकरी सुजलाम सुफलाम होऊ दे, पाऊस वेळेवर पडू दे, अशी दुवा प्रार्थना अल्लाह कडे करण्यात आली. यावेळी सर्व मुस्लिम बांधवांनी प्रत्येक उपस्थितांची गळाभेट करीत बकरी ईदच्या शुभेच्छा एकमेकांना दिल्या. या संपूर्ण ईदच्या कार्यक्रमाप्रसंगी राशीन पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब मुळीक, कॉन्स्टेबल मुरकुटे, सचिन जाधव, मुरली गोगे, यांच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker