मनस्वी पाटीलचे शैक्षणिक क्षेत्रात तेजस्वी यश – दहावी (CBSE) परीक्षेत ९८% गुण

कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत तालुक्यातील सामाजिक कार्याच्या अग्रणी संस्थांपैकी एक असलेल्या संत सद्गुरू गोदड महाराज अधिकृत अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मा. शशिकांत दादा पाटील यांच्या पुतणीने शैक्षणिक क्षेत्रात उज्ज्वल यश संपादन करून पाटील कुटुंबियांचा आणि संपूर्ण तालुक्याचा मान उंचावला आहे. कुमारी मनस्वी किरण पाटील हिने संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, कोल्हापूर या प्रतिष्ठित शाळेतून इयत्ता दहावी (CBSE बोर्ड) मध्ये 98% गुण मिळवत उत्तीर्ण होण्याचा गौरव मिळवला आहे. तिच्या या अफाट यशाबद्दल संपूर्ण पाटील कुटुंबीय, विद्यालयाचे शिक्षकवर्ग, आणि ग्रामस्थांकडून ती अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव अनुभवत आहे.
मनस्वी ही लहानपणापासूनच अभ्यासात हुशार, मेहनती, आणि शिस्तप्रिय विद्यार्थिनी म्हणून ओळखली जाते. तिच्या या यशामागे तिची चिकाटी, तिच्या आई-वडिलांचे मार्गदर्शन आणि शिक्षकांचे अमूल्य सहकार्य या साऱ्या घटकांचा मोलाचा वाटा आहे. मनस्वीचे आजोबा यशवंत शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. पांडुरंग आप्पा पाटील व आजी कै. निर्मला (मावशी) पांडुरंग पाटील यांचीही प्रेरणा व संस्कार तिच्या बरोबर आहेत
या यशानंतर मनस्वीने आपल्या पुढील शैक्षणिक प्रवासात विज्ञान शाखा निवडण्याचा मानस व्यक्त केला असून, वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करण्याची तिची इच्छा आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले पाटील यांनी देखील तिचे अभिनंदन केले
संत सद्गुरू गोदड महाराज अन्नछत्र मंडळ, शशिकांत दादा पाटील यांचे कार्य, आणि त्यांच्या कुटुंबीयांची समाजसेवेतील ओळख ही प्रेरणादायी आहे. त्यांच्याच घरातील एक सदस्या शिक्षणात एवढे मोठे यश संपादन करते, ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे.
कुमारी मनस्वी किरण पाटील हिला हार्दिक हार्दिक अभिनंदन व तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी अनंत शुभेच्छा!