pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

कर्जत तालुक्याचे सुपुत्र सुनिल कदम यांचे UPSC मध्ये यश – AIR 727

Samrudhakarjat
4 6 2 7 4 7

कर्जत तालुक्यातील प्रतगशील शेतकरी म्हणून नावलौकिक असलेले दिवंगत सुभाष कदम यांचे सुपुत्र श्री. सुनिल सुभाष कदम (रा. बारडगाव (दगडी), ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत ऑल इंडिया रँक 727 मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशाच्या जोरावर त्यांची निवड Indian Revenue Service (IRS) या प्रतिष्ठित सेवेसाठी झाली आहे.

विशेष म्हणजे यापूर्वीही सुनिल कदम यांनी UPSC परीक्षेत यश मिळवत Border Security Force (BSF) मध्ये Assistant Commandant म्हणून सेवा बजावली होती. मात्र अधिक उंच भरारी घेण्याच्या ध्यासाने त्यांनी त्या पदाचा राजीनामा देऊन पुन्हा UPSC परीक्षा देण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि आपल्या जिद्द, चिकाटी आणि परिश्रमांच्या जोरावर पुन्हा एकदा यश संपादन केले.

बारडगावसारख्या खेडेगावातून येऊन एकदा नव्हे तर तब्बल दोन वेळा UPSC सारखी अत्यंत कठीण परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी विलक्षण जिद्द आणि आत्मविश्वास लागतो. त्यातही Assistant Commandant सारख्या मोठ्या पदाचा राजीनामा देऊन पुन्हा परीक्षा देण्याचे धाडस करणे हे खरोखर प्रेरणादायी आहे. सुनिल कदम यांच्या या जिद्दीला मनापासून सलाम.

या संपूर्ण प्रवासात त्यांना त्यांच्या पत्नी सौ. विनया कदम यांची मोलाची साथ लाभली. त्या पुणे महानगरपालिकेत सहायक विधी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

सुनिल कदम यांच्या या यशाचा कर्जत तालुक्यासह संपूर्ण परिसराला सार्थ अभिमान आहे. – ॲड. विकास शिंदे, 9604536060

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker