pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

प्रा. विशाल पंडित कोपनर यांना फार्मास्युटिकल सायन्सेसमध्ये पीएचडी पदवी प्रदान

Samrudhakarjat
4 6 1 5 7 4

कर्जत (प्रतिनिधी) :-  निंबे गावचे सुपुत्र डॉ. विशाल पंडित कोपनर यांना आज फार्मास्युटिकल सायन्सेस (Pharmaceutical Sciences) या क्षेत्रातील सर्वोच्च पदवी पीएचडी (Doctor of Philosophy) प्रदान करण्यात आली. त्यांनी “Formulation, Development and Assessment of a Gastrointestinal Herb” या अत्यंत महत्त्वपूर्ण व संशोधनात्मक विषयावर यशस्वीरीत्या प्रबंध सादर करून ही पदवी संपादन केली आहे. ही पदवी Sunrise University, राजस्थान येथून प्रदान करण्यात आली असून त्यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

डॉ. विशाल कोपनर यांच्या संशोधन कार्याला मार्गदर्शक म्हणून डॉ. कुलदीप सिंग पटेल यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली

प्रा. विशाल कोपनर यांनी (Gastrointestinal आजारांवर उपयुक्त ठरणाऱ्या हर्बल औषधांच्या फॉर्म्युलेशन, विकास व त्यांचे मूल्यमापन या विषयावर सखोल संशोधन केले. सद्यस्थितीत वाढत चाललेल्या पचनसंस्थेच्या विकारांवर नैसर्गिक व सुरक्षित उपचार पद्धती विकसित करण्याच्या दृष्टीने हे संशोधन अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

ग्रामीण भागातून शिक्षणाची सुरुवात करून सातत्य, मेहनत व जिद्दीच्या जोरावर पीएचडीपर्यंतचा प्रवास पूर्ण करत डॉ. विशाल कोपनर यांनी शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत आपल्या कुटुंबाचा, निंबे गावाचा तसेच संपूर्ण परिसराचा नावलौकिक वाढवला आहे. त्यांच्या या यशामुळे मित्रपरिवार, नातेवाईक, शिक्षकवर्ग आणि ग्रामस्थांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

डॉ. विशाल कोपनर यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत असून भविष्यात त्यांच्या संशोधनातून समाजोपयोगी व आरोग्यदायी औषधनिर्मितीसाठी मोलाचे योगदान लाभेल. त्यांच्या पुढील शैक्षणिक व संशोधनात्मक वाटचालीसाठी सर्वत्र शुभेच्छा दिल्या जात आहेत.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker