pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

कर्जत पोलिसांची गोवंश जनावराची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या तस्करा विरुद्ध धडाकेबाज कामगिरी

Samrudhakarjat
4 6 1 5 8 5

दिनांक 11/02/2025 रोजी रात्री 20/08 वा. चे सुमारास मा.पोलीस निरीक्षक सो यांच्या आदेशाने पोहेकॉ राजेंद्र थोरात, पोलीस कॉन्स्टेबल दीपक कोल्हे ,लक्ष्मण ढवळे, मनोज मुरकुटे,अर्जुन पोकळे असे आम्ही कर्जत पोस्टे हद्दीत लॅपटॉप ,पोर्टेबल प्रिंटर सिलसाहित्य पेट्रोलिंग करणेकामी तसेच अवैध धंद्यावर कारवाई करणेकामी रवाना होऊन बेनवडी गावचे शिवारात कर्जत ते राशीन जाणारे रोडवर नाना नानीचे मळ्याजवळ पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र थोरात यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,आताच राशीन कडुन कर्जतच्या दिशेने विटकरी रंगाचा टाटा आयशर कंपनीचा चारचाकी वाहनात गोवंश जातीचे जनावरे कत्तलीसाठी घेवुन जात असलेबाबत माहीती मिळाल्याने त्यांनी सदर बातमीतील हाकीगत पोलीस स्टाफ यांना सांगुन पोहेकॉ राजेंद्र थोरात यांनी लागलीच दोन पंचांना बेनवडी गावचे शिवारात कर्जत ते राशीन जाणारे रोडवर नाना नानीच्या मळ्याजवळ बोलावुन घेवुन त्यांना सदर बातमीतील हकीगत समजावुन सांगुन पंचनामा करणेकामी सोबत राहण्यास सांगितल्याने सदर पंचांनी त्यास सहमती दिली असता पोलीस स्टाफ व पंच असे कर्जत ते राशीन जाणारे रोडवर नाना नानीच्या मळ्याजवळ थांबलो असता पोलीस स्टाफ व पंच यांना नमूद बातमीतील हकीगत प्रमाणे राशीन कडुन कर्जतच्या दिशाने विटकरी रंगाचा टाटा आयशर कंपनीचा चारचाकी वाहन येताना दिसले असता आम्ही पोलीस स्टाफ व पंचानी सदर वाहनास दिनांक 12/02/2026 रोजी 00/15 वा चे सुमारास हात दाखवुन वाहन थांबवण्याचा इशारा केला असता सदर वाहनावरील चालक याने वाहन थांबविले. त्यानंतर चालक यास आम्हा पोलीस व पंचांची ओळख करुन देवुन त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव नवनाथ गोरख साळवे रा. राशीन ता. कर्जत जि. अहिल्यानगर असे सांगितले. त्यानंतर त्याचे ताब्यातील वाहनाची दोन पंचासमक्ष पाहणी केली असता गाडीमध्ये मागील हौदयात गोवंश जातीचे जनावरे दिसली तेंव्हा त्यास सदर जनावरे कोणाचे मालकीची आहेत व कोठे चालवली आहेत याची विचारणा केली असता त्याने सांगितले की, सदरची जनावरे ही 1. राजु महेबुब कुरेशी 2. इरफान इस्माईल कुरेशी दोघे रा. कुरेशीगल्ली, राशिन ता. कर्जत जि अहिल्यानगर याचे मालकीची असुन ती कत्तलीसाठी चालविली असल्याचे सांगितले. त्यानंतर आम्हा पोलीस व पंचाची खात्री झाल्यानंतर सदरची गोवंश जातीचे जनावरे व टाटा आयशर वाहनाची दोन पंचासमक्ष पाहणी केली असता त्याचे वर्णन खालील प्रमाणे.

1) 1,10,000/- रु कि.चे गोवंश गावरान जातीची पांढरे रंगाचे 03 बैल, 01 खोंड व 01 गाय किं.अं.

2) 40,000/- रु कि.ची 02 तांबडे रंगाची गोवंश गिर जातीची गायी कि.अं.

3) 2,60,000/- रु कि.चे 13 काळ्या पांढरे रंगाचे गोवंश जर्शी जातीचे गायी. कि.अं.

4) 30,000/- रु कि चे 03 काळ्या रंगाचे गोवंश जर्शी जातीचे वासरे किं अं.

4) 12,00,000/- रु कि.चे 01 विटकरी रंगाचा टाटा आयशर कंपनीचा टेम्पो गाडी तिचा पांसिग नंबर एम.एच. 16 सी डी 1990 असा असलेली जु.वा.किं.अं.

16,40,000/- रु. एकुण.

येणे प्रमाणे आज दि.12/02/2026 रोजी 00/15 वा. चे सुमारास बेनवडी गावचे शिवारात राशीन ते कर्जत जाणारे रोडवर नाना नानीचे मळ्याजवळ वरील वर्णनाचे व किंमतीचे गोवंश जर्शी, गावरान, गिर जातीचे जनावरे ही विटकरी रंगाचा टाटा आयशर कंपनीचा टेम्पो गाडी तिचा पांसिग नंबर एम.एच. 16 सी डी 1990 गाडीतुन जनावरांना चारापाण्याची व्यवस्था न करता, त्यांना यातना व पिडा होईल अशा पध्दीतीने दाटीवाटीने भरुन दाव्याने बांधलेल्या स्थितीत कत्तल करण्यासाठी घेवुन जात असताना मिळुन आले. त्यानंतर पोहेकॉ /राजेंद्र थोरात यांनी दोन पंचासमक्ष चार चाकी वाहनाच्या उजेडामध्ये पंचनामा करुन सदरची गोवंश जातीचे जनावरे व चारचाकी वाहन ताब्यात घेवुन कर्जत पोलीस स्टेशन येथे घेऊन येऊन 1) चालक नवनाथ गोरख साळवे रा. राशिन ता. कर्जत जि. अहिल्यानगर 2) राजु महेबुब कुरेशी (3) इरफान इस्माईल कुरेशी दोघे रा. कुरेशी गल्ली, राशिन ता. कर्जत जि.अहिल्यानगर यांचे विरुध्द कर्जत पोलीस स्टेशन येथे पोलीस कॉन्स्टेबल 25 95 मनोज पोपट मुरकुटे यांचे फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 54/2026 महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम सन 1995 चे सुधारीत 2015 चे कलम 5 (अ) (ब), 9 सह प्राण्यांना निर्दयतेने वागविने प्रतिबंधक कायदा कलम 3,11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल किरण बारवकर हे करत असून सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे सो, अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलबुरमे सो, उपविभागीय पोलिस अधिकारी कर्जत विभाग कर्जत श्री प्रवीण लोखंडे सो यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री सोपान शिरसाट यांचे आदेशाने पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र थोरात पोलीस कॉन्स्टेबल दीपक कोल्हे,अर्जुन पोकळे , मनोज मुरकुटे, लक्ष्मण ढवळे,संजय सानप,अशांनी केली आहे…

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker