pub-1628281367759110
Advertisement
ब्रेकिंग

राशीन मध्ये मुस्लिम समाजाचा कर्जत तालुका एकदिवशीय इस्तेमा संपन्न. 

Samrudhakarjat
4 6 0 0 8 4

राशीन प्रतिनिधी जावेद काझी. :- राशिन काझीनगर (एस.के. कंपनी )परीटवाडी ता . कर्जत येथे तालुक्यातील मुस्लिम समाज बांधवांचा शनिवार दि.३१.१.२०२६. रोजी सकाळ ६ ते रात्री ९.वा. पर्यंत एकदिवशीय इस्तेमा आयोजित करण्यात आला होता .यामध्ये सकाळी नमाजे फजर ते इशा या नमाजे दरम्यान वेगवेगळ्या मौलाना हाफीज, आलीम, मुफ्ती यांनी धर्मनिरपेक्षता सामाजिक बांधिलकी हिंदू मुस्लिम भाईचारा, सामाजिक तेड निर्माण होईल असे युवकांनी वागू नये.

युवकांनी निर्व्यसनी राहावे ,मुस्लिम समाजातील प्रत्येकाने नमाज, कुरान,पठन नित्यनिमित्त पणे करणे, अशा वेगवेगळ्या विषयावर प्रत्येक नमाज च्या दरम्यान प्रवचन करून योग्य संदेश देण्यात आले. शेवटी बोलताना मौलाना मुफ्ती महेबूब (औरंगाबादवाले) यांनी आई वडिला बरोबर कसे वागावे, कसे बोलावे, त्यांची सेवा कशी करावी, वडिलोपार्जित वारस हक्काच्या प्रॉपर्टीत लग्नानंतर बहिणीचा (हक)अधिकार आहे तो त्यांना द्या, कुणाची तळतळाट घेऊ नका, कोणालाही विनाकारण त्रास देऊ नका, विनाकारण कोणावरही अन्याय करू नका, कमी लेखू नका, मोठेपणा करू नका खास करून मुस्लिम समाज बांधवांना विनंती की उमरा, हज, करण्याचा दिखावा करण्यापेक्षा घरातील आई-वडिलांची भाऊ बहिणींची सेवा करा, त्यांचा योग्य सांभाळ करा, खास करून युवकांनी, मोबाईल पासून दूर राहा, संगत चांगल्याशी ठेवा, आई वडील किंवा इतर वडीलधारी माणसाशी चांगले वागा, दररोज नमाज कुराण, चे पठण करा, असा संदेश कर्जत तालुक्यातील मुस्लिम समाज बांधवांना यावेळी देण्यात आला. शेवटी मुफ्ती महेबूब यांनी हिंदू मुस्लिम भाईचारा सुख शांती अमन सामाजिक बांधिलकी आबादीत राहण्यासाठी अल्लाहकडे (दुवा)प्रार्थना केली, यावेळी राशीन सहित कर्जत तालुक्यातील मौलानाआलिम हाफीज तमाम उलेमा ए दिन व मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

4.5/5 - (2 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
pub-1628281367759110

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker