वंचित बहुजन आघाडी व वृद्ध भूमीहीन शेतीमजुर व इतर संघटनेचा कर्जत तहसील वर जवाब दो मोर्चा

राशीन( प्रतिनिधी )जावेद काझी. :- ॲड.डॉ. अरुण जाधव वंचित बहुजन आघाडी राज्य समन्वयक आणि शब्बीर भाई पठाण वृद्ध भूमीहीन संघटना यांच्या नेतृत्वाखाली कर्जत तहसील कार्यालयासमोर जवाब दो मोर्चा हजारोच्या संख्येने पार पाडला.सोमवार दिनांक 05/06/2023 रोजी कर्जत तहसीलवर जवाब दो मोर्चा ढोल ताशा सनई वाद्यांच्या सुरात मोठ्या घोषणा बाजी करत काढण्यात आला हा मोर्चा वंचित बहुजन आघाडी आणि शेतकरी शेतमजूर वृद्ध भूमिहीन आणि महिला संघटना यांच्या संयुक्त वतीने काढण्यात आला होता .या मोर्चात हजारोच्या संख्येने कर्जत तालुक्यातील नागरिक सहभागी झाले होते यामध्ये युवकांचा,. महिलांचा,, ज्येष्ठ नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून येत होता.
वंचित बहुजन आघाडी, वृद्ध भूमिहीन शेतमजूर, महिला संघटना, ज्येष्ठ नागरिक संघ, लोक अधिकार आंदोलन संघटना, एकलव्य संघटना, पारधी विकास कृती समिती यांच्या वतीने काढण्यात आला होता.
या मोर्चाचे मुख्य नेतृत्व ॲड. डॉ. अरुण जाधव असून गायरान जमीन नियमाकुल करून सातबारावर नोंद लावणे, भूमिहीन लोकांच्या पाल्यांना शिष्यवृत्तीत सवलत मिळावे, कर्जत तालुक्यात 1972 ते 2022 रोजी झालेल्या झोपडपट्ट्या कायम करण्यात यावात व त्यांची सिटी सर्वे वर नोंद करण्यात यावी, कर्जत तालुक्यातील मंजूर घरकुलांचे हप्ते लाभार्थ्यांच्या खात्यात त्वरित जमा करावेत, संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना एक हजार वरून तीन हजार पर्यंत मानधन करण्यात यावे, दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना अमलात आणावी, कर्जत तालुक्यातील लोक कलावंतांचा कोटा शंभर वरून दोनशे करण्यात यावा, रेशन कार्ड वरील धान्य त्वरित चालू करावे. भटके विमुक्तांसाठी यशवंतराव चव्हाण योजना, आदिवासी शबरी योजना ,ठक्कर बाप्पा योजना, कर्जत शहरातील मुख्य रस्ता कॉंक्रिटीकरण हे निकृष्ट दर्जाचे झाले असून त्याची संपूर्ण क्वालिटी कंट्रोल मार्फत चौकशी करण्यात यावी कर्जत आळसुंदा रोडचे काम सुरू करण्यात यावे तसेच थेरवडी रस्त्यालगत मेन कॅनल पासून पळस वाड्यापर्यंतचे रोडचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे. सर्वे नंबर 81 कर्जत कोळवड शिव रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्यात यावेअशा विविध योजनेसाठी कर्जत तालुक्यातील महिला आणि पुरुष मोठ्या प्रमाणात तहसील कार्यालय कर्जत समोर एकत्र आले होते.
या मोर्चामध्ये बोलताना ॲड. डॉ. अरुण जाधव आबा यांनी भटके विमुक्त आदिवासी समाजाचे प्रश्न व्यथा सरकार दरबारी तहसीलदार समोर मांडल्या या मागण्यांचा कर्जत तालुक्यात असणाऱ्या दोन आमदार आणि एक खासदार यांनी विचार केला नाही तर आमदारांच्या घरासमोर आंदोलन करू असा इशारा दिला, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी या मोर्चासाठी शुभेच्छा दिल्या आहेत . शब्बीर भाई पठाण यांनी भावनिक होऊन त्यांनी मनोगत व्यक्त केले म्हणून आज शब्बीर भाई पठाण आमचे नेते आहेत .असा इशारा दिला.
भविष्यात अरुण जाधव आणि मी सोबत आहोत असे बोलताना शब्बीर भाई पठाण म्हणाले तर ज्या माणसाने भटके मुक्त आदिवासी समाजासाठी आयुष्य घालवले अशा नेत्याला आता सर्वांनी मिळून बळ देऊन वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून निवडून आणावे असे बोलताना लोक अधिकार आंदोलन संघटनेचे प्रवक्ते बापू ओहोळ म्हणाले, या मोर्चात प्रा. विक्रम कांबळे, केसकर सर ,तुकाराम पवार ,गाडे सर ,सावकार भोसले , राहुल भोसले,छल्लो काळे, लता सावंत यांनी मनोगते व्यक्त केली. या मोर्चासाठी लोकाधिकार आंदोलन संघटनेचे प्रवक्ते बापू ओहोळ, उमाताई जाधव ,माय लेकरू प्रकल्पाचे समन्वयक सचिन भिंगारदिवे, निवारा बालगृहाचे अध्यक्ष केसकर सर, आदिवासी पारधी समाजाचे नेते विशाल पवार, संतोष चव्हाण सर, मचू अण्णा, संतोष चव्हाण सोनेगाव, राजू शिंदे, अतुल ढोणे, कर्जत तालुका तालुका समन्वयक गाडे सर, पारधी विकास कृती समितीचे संघटक तुकाराम पवार, वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुकाध्यक्ष सोमनाथ भैलुमे, एकलव्य संघटनेचे सोमनाथ गोरे, शितल काळे, काजोरी पवार ,रंगेशा काळे, श्रीगोंदा तालुक्यातील पारधी कृती समितीचे संघटक संतोष भोसले, पल्लवी शेलार, लता सावंत,उज्वला मदने, सुनिता बनकर, पारधी समाज नेते पप्पू भोसले, गीता बर्डे एकलव्य संघटना, सय्यद भाई काटे वाले, गोविंद तांदळे भटके मुक्त नेते, वेंकट तांदळे, केतन पाटोळे धनगर समाजाचे नेते, अंकुश साळवे, संजय शेलार ,हनुमंत मोरे, दीपक बैलमे ,संभाजी धोत्रे ,संदीप अडसूळ, रमेश शेलार ,कायदेशीर पवार, अतुल गायकवाड ,महादेव बर्डे ,पप्पू गायकवाड ,बापू बर्डे, सुभाष बेर्डे ,गोविंद तांदळे, सावकार भोसले ,चंपा पवार ,जयश्री चव्हाण ,शिल्पा काळे ,जया काळे ,शुभांगी गोहेर, रोहिणी राऊत ,पारधी समाज नेते धीरज भोसले,फरीदा शेख ,अर्चना भैलूमे असे विविध क्षेत्रातून हजारो महिला व पुरुष उपस्थित झाले होते मोर्चामध्ये vba सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष बापू ओव्हळ आणि त्यांचे सहकारी तसेच वंचित बहुजन आघाडी कर्जत तालुक्यातील सर्व पदाधिकारी राशीन शहराध्यक्ष दादा आढाव, तालुका संघटक अमोल गंगावणे,शिवानंद पोटरे अंकुश साळवे चांद मुजावर मुबारक सय्यद संजय शेलार रमेश शेलार गोदड समुद्र संजय कदम, निर्मलाताई भैलुमे , छाया कांबळे, श्रीनिवास गजरमल,भगवान गजरमल, संदीप आढाव.बंडा भैलुमे, एड. बी डी चव्हाण, रवी सोनवणे श्रीगोंदा तालुक्यातील संतोष भोसले सह सर्व सहकारी जामखेड तालुक्यातील बापु ओव्हळ , आजिनाथ शिंदे, सचिन भिंगार दिवे यांच्यासह सर्व सहकारी यांच्यासह कर्जत तालुक्यातील पदाधिकारी भीमसैनिक हजारोच्या संख्येने उपस्थित होते
हा जवाब दो मोर्चा यशस्वी करण्यासाठी शेतकरी शेतमजूर वृद्ध भूमिहीन महिला संघटना अध्यक्ष शब्बीर भाई पठाण आणि त्यांचे सर्व सहकारी तसेच वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुकाध्यक्ष सोमनाथ भैलुमे, भारतीय सत्यशोधक विक्रम कांबळे जिल्हा संघटक नंदकुमार गाडे , पारधी विकास आराखडा कृती समिती सदस्य तुकाराम पवार. गोदड समुद्र ,अर्चना भैलुमे ,फरीदा शेख, गोहेर मॅडम ,शितल काळे,,, सोमनाथ गोरे यांनी अतिशय मोलाचे परिश्रम घेतले आणि हा मोठा भव्य दिव्य असा मोर्चा घडवून आणला. हजारोंच्या संख्येने युवक लहान थोर आणि महिला उपस्थित राहीलात आपले सर्वांचे वंचित बहुजन आघाडी चे माजी तालुका अध्यक्ष सोमनाथ भैलुमे यांनी मनापासून आभार व्यक्त केले.