राशीनच्या श्री जगदंबा विद्यालयातील समिया काझी व स्मितल मंडलिक या दोन्ही मुली इंग्लिश विषयात प्रथम.

राशीन( प्रतिनिधी) जावेद काझी :- रयत शिक्षण संस्थेचे श्री जगदंबा विद्यालय राशीन या विद्यालयाचा 2023 चा दहावीचा एकूण निकाल ९४ /.टक्क्याच्या वर लागला असून इंग्रजी विषयात समिया इम्रान काझी व स्मितल सुनील मंडलिक या दोन्ही मुलींनी १०० पैकी ९५
गुण मिळवीत जगदंबा विद्यालयात इंग्रजी विषयात प्रथम क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे दोघींना एकूण विषयात ९१ टक्के गुण प्राप्त झाले आहे, दोघींच्या या घवघवीत मिळालेला यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य श्री खंडागळे सर, उपप्राचार्य तावरे सर, पर्यवेक्षक साळवे राजेंद्र, सोनवणे नवनाथ, उपशिक्षक घालमे सर, तनपुरे आजिनाथ
भिसे मधुकर, वारे बाबासाहेब, राऊत महेश, दिगंबर, पालक व ग्रामस्थ यांच्याकडून काझी व मंडलिक यांना मिळालेल्या यशाबद्दल कौतुक करीत अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. समिया ही मंडलाधिकारी कार्यालयातील कार्यरत असलेल्या टंकलेखक इम्रान काझी यांची मुलगी आहे तर
स्मितल ही शिक्षक सुनील मंडलिक यांची मुलगी आहे.