समृद्ध कर्जत :- आज दिनांक- १३ मे रोजी पुणे बोर्डाचा शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ चा इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला. *या ही वर्षी न्यू गुरुकुल इंग्लिश स्कूल ची १००% निकालाची परंपरा कायम राहिली* . अन्सारी मिसबा मोहम्मद अहमद (९५.४०%) गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. बिबे प्रेरणा चंदू (९५.२०%) गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला. पोकळे श्रेया संदीप (९१.८०%) गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. माने ज्ञानेश्वरी दत्तात्रय (९०.६०%) गुण मिळवून चतुर्थ क्रमांक पटकावला. चव्हाण सिद्धांत संदीप (९०.२०%) गुण मिळवून पाचवा क्रमांक पटकावला.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे अभिनंदन,संस्थेचे मार्गदर्शक श्री. संभाजी लांगोरेसाहेब (अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. अहिल्यानगर) , श्री. किरणजी नाईक (समन्वयक ) , श्री .शिवाजी पाटील (मुख्याध्यापक), राजेंद्रकुमार काळे (पर्यवेक्षक) आणि सर्व शिक्षकवृंद यांनी केले आणि सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.