१२वीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्सुकता शिगेला

समृद्ध कर्जत (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) अंतर्गत घेण्यात आलेल्या इयत्ता १२वी (HSC) बोर्ड परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. लाखो विद्यार्थ्यांचे डोळे सध्या अधिकृत वेबसाइटकडे लागले असून, निकालाची वेळ व संकेतस्थळ जाहीर करण्यात आली आहे.
राज्य मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार, निकाल उद्या दुपारी १ वाजता जाहीर केला जाईल. विद्यार्थी mahresult.nic.in, hscresult.mkcl.org, तसेच mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळांवर आपला रोल नंबर व इतर तपशील भरून निकाल पाहू शकतील.
महत्त्वाची माहिती : निकालाची तारीख: ५ मे २०२५ (उद्या) वेळ: दुपारी १ वाजता अधिकृत संकेतस्थळ:
mahresult.nic.in
hscresult.mkcl.org
mahahsscboard.in
या वर्षी सुमारे १५ लाखांहून अधिक विद्यार्थी १२वीच्या परीक्षेला बसले होते. राज्यातील सर्वच विभागांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या मेहनतीने परीक्षा दिली होती. निकालाच्या दिवशी वेबसाइटवर तांत्रिक अडचणी येऊ शकतात, त्यामुळे संयम राखावा, असा सल्ला मंडळाने दिला आहे.
निकालानंतर पुढील टप्पे : निकाल पाहिल्यानंतर जर एखाद्या विद्यार्थ्याला उत्तरपत्रिकेच्या फेरतपासणीसाठी अर्ज करायचा असेल, तर मंडळ याची प्रक्रिया लवकरच जाहीर करणार आहे. तसेच, विद्यार्थ्यांचे मूल्यमापन आणि मार्कशीट वितरणाची माहिती शाळांमार्फत दिली जाईल.