लोकनेते अजितदादा पवार : एक झंझावाती नेतृत्व हरपले!


राशिन प्रतिनिधी जावेद काझी.
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे, रोखठोक आणि विकासकामांचा ध्यास असलेले व्यक्तिमत्व म्हणजे अजितदादा पवार. प्रशासनावर असलेली त्यांची पकड, शब्दाला जागणारा नेता आणि पहाटेपासून कामाला लागणारा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ख्याती अवघ्या महाराष्ट्राला आहे.

अजितदादांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले, ज्यामुळे राज्याच्या विकासाला गती मिळाली. त्यांच्या कामाची शिस्त आणि स्पष्टवक्तेपणा नेहमीच सर्वांच्या आदराचा विषय ठरला. जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेला आणि ते प्रश्न तडीस लावणारा हा ‘दादा’ आज आपल्यात नाही, ही भावनाच मनाला चटका लावून जाणारी आहे.
कर्जत तालुक्याच्या विकासासाठीही त्यांचे योगदान मोलाचे राहिले आहे. दादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे. अशा या कणखर नेत्यास कर्जत तालुक्यातील

सर्व राजकीय, सामाजिक, शैक्षणिक
संस्था व समृद्ध कर्जत पोर्टल वतीने भावपूर्ण विनम्र श्रद्धांजली! दादा तुमच्या परत येण्याची संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत आहे.



