google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राशीन शहराध्यक्षपदी दीपक जंजिरे यांची निवड. 

Samrudhakarjat
4 9 1 8 6 6

राशीन प्रतिनिधी जावेद काझी. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विकासाभिमुख विचारांनी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा व उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांच्या कार्यातून प्रेरित होऊन, खासदार पार्थ पवार (राष्ट्रीय सचिव), प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे आणि युवा नेते जय पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्जत तालुकाध्यक्ष ॲड. बाळासाहेब शिंदे यांच्या हस्ते आज कर्जत तालुक्यातील राशीन येथील शाहू नगर कॉलनी येथे पक्षप्रवेश व नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

यावेळी पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना अधिकृत नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. त्यामध्ये ऋषभ अनंतसिंग परदेशी यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, कर्जत तालुका उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.

तसेच दीपक बाप्पू जंजिरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राशीन शहराध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शुभम राजपूत, प्रेम तेवर आणि राजू प्रजापती यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राशीन शहर उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.

नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. उपस्थित कार्यकर्ते, मित्र परिवार व मान्यवरांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker