google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) च्या वतीने राशीन ग्रामपंचायतीला विविध मागण्यांचे निवेदन

वार्ड क्र. ३ व ४ मधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ सोडावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा

Samrudhakarjat
4 9 2 1 1 8

राशीन (प्रतिनिधी: जावेद काझी):

राशीन ग्रामपंचायत हद्दीतील वार्ड क्रमांक ३ आणि ४ मधील रहिवाशांच्या पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठी बोअरवेल घेण्यात आली आहे. मात्र, या बोअरवर अद्याप हँडपंप (हापसा) बसवण्यात आला नसल्याने या परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत आहे. पाणी वेळेवर मिळत नसल्याने नागरिकांच्या दैनंदिन अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

या समस्येची गंभीर दखल घेत, राशीन ग्रामपंचायतीचे प्रशासक व ग्रामविकास अधिकारी यांनी तात्काळ लक्ष घालून सदर बोअरवर हापसा बसवावा आणि नागरिकांची पाण्याची अडचण दूर करावी, या मागणीचे निवेदन आज सकाळी ११:०० वाजता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने ग्रामपंचायत प्रशासनाला सादर करण्यात आले. हे निवेदन शिवसेना शहराध्यक्ष जितेंद्र स्वामी शेटे राशीनकर व इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत लिपिक उत्कर्षा शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आले.

दिलेल्या निवेदनाची प्रशासक व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल न घेतल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र लक्षवेधी आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही याप्रसंगी देण्यात आला.

दिवंगत अजित दादा पवार यांना अभिवादन

निवेदन देण्यापूर्वी राशीन ग्रामपंचायत कार्यालयात दिवंगत अजित दादा पवार यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

यावेळी शिवसेनेचे तालुका समन्वयक सुभाष जाधव, शहर प्रमुख जितेंद्र स्वामी शेटे, उपशहर प्रमुख अमृत जंजिरे, उपशहर प्रमुख संदीप राऊत, उपशहर प्रमुख साहिल शेख, शाखाप्रमुख सुनील काका दडगळ, शाखाप्रमुख अमोल दळवी, शाखाप्रमुख सागर शेठपगी, अनिल शेठ देवगावकर यांच्यासह इतर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते…

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker