google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

वंचित बहुजन पक्षाने पुकारलेल्या राशीन बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; विविध पक्ष आणि सामाजिक संघटनांचा पाठिंबा

Samrudhakarjat
4 9 2 3 2 2

राशीन (प्रतिनिधी – जावेद काझी):

श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला प्रतिसाद देत आज राशीन शहर व परिसरात सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेत कडकडीत बंद पाळण्यात आला. विद्यार्थ्यांवर व इतर नागरिकांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या या बंदला राशीनमध्ये नागरिकांसह विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

​या बंद व निषेध मोर्चामध्ये वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष अंकुश साळवे, कर्जत तालुकाध्यक्ष पोपटराव शेटे, राशीन शहराध्यक्ष दादासाहेब आढाव, शहर उपाध्यक्ष दत्तात्रय सोनवणे, कायदेशीर सल्लागार ॲड. शुभम पानसरे, महासचिव अनिल आढाव, सहसल्लागार ॲड. आकाश साळवे आणि शहर संघटक मुकुंद आढाव यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

​या आंदोलनाला माजी सरपंच रामकिसन साळवे, गणेश कदम, अनिल लष्करे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे सुभाष जाधव, तसेच बहुजन समाज पार्टी, मराठा महासंघ, संभाजी ब्रिगेड आणि छत्रपती शासन महाराष्ट्र राज्य ग्रुप यांसह विविध पक्ष व सामाजिक संघटनांनी जाहीर पाठिंबा देऊन निषेध मोर्चामध्ये सहभाग नोंदवला.

​या वेळी विद्यार्थीआंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर प्रशासनाने केलेला लाठीचार्ज हा लोकशाहीचा गळा आवळणारा प्रकार असून, या घटनेतील दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी या मोर्चामार्फत करण्यात आली.

​दिवसभरात राशीन मधील व्यापारी व ग्रामस्थांनी स्वतःहून व्यवहार बंद ठेवून या निषेध आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. संपूर्ण राशीन शहर परिसरात बंद अत्यंत शांततेत व कडकडीत पार पडला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker