साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनी राशिनमध्ये अभिवादन
मातंग एकता आंदोलनाच्या वतीने अभिवादन कार्यक्रम; विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह ग्रामस्थांची उपस्थिती


(राशीन प्रतिनिधी जावेद काझी) :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या ५७ व्या स्मृतिदिनानिमित्त राशिन येथील अण्णाभाऊ साठे चौकात मातंग एकता आंदोलन या सामाजिक संघटनेच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले.

रिपब्लिकन पक्षाचे तालुका युवक अध्यक्ष भीमराव साळवे आणि माजी ग्रामपंचायत सदस्य अशोक जंजिरे यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी अण्णाभाऊंच्या कार्याचे स्मरण करत त्यांना आदरांजली वाहिली.
या अभिवादन कार्यक्रमास सेवानिवृत्त सहायक पोलिस उपनिरीक्षक तुळशीदास सातपुते, संजय ढगे, दादासाहेब परदेशी, महादेव जांभळकर, पत्रकार दत्ता उकिरडे, किशोर कांबळे, जावेद काझी, मातंग एकता आंदोलनाचे शहराध्यक्ष संतोष ढावरे, तसेच महेश उकिरडे, गणेश उकिरडे, पप्पू मासाळ, आनंद उकिरडे, माऊली उकिरडे, भाऊ उकिरडे, संदीप साळवे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

साहित्य, समाजप्रबोधन आणि वंचित-शोषितांच्या हक्कांसाठी आपल्या लेखणी व लोककलेच्या माध्यमातून आवाज बुलंद करणाऱ्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचे यावेळी स्मरण करण्यात आले. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमातून त्यांच्या विचारांना आणि सामाजिक कार्याला उपस्थितांनी अभिवादन केले.


