वयस्कर महिलेस लुटणाऱ्या अज्ञात चोरट्याचे कर्जत पोलिसांनी 48 तासात मुसक्या आवळल्या.

राशीन (प्रतिनिधी): जावेद काझी .मंगळवार दि.29,4,2025. रोजी राजे वस्ती राशीन ता. कर्जत येथील वयस्कर महिला कोंडाबाई किसन गवळी वय वर्ष 60 या राशीन येथील आठवडे बाजारात जाण्यासाठी घरातून सकाळी अकरा वाजता निघून भिगवन राशीन रोडवर बालाजी फर्निचर जवळ रोडलगत बसलेले असताना पांढऱ्या रंगाच्या कारमधून आलेल्या एका अज्ञात कारचालकाने चला मी तुम्हाला राशिन मध्ये सोडतो असे म्हणून कालच्या पुढील
सीटवर वयस्कर महिलेस बसवणे त्यानंतर गाडी थोड्या अंतरावर गेली असता वयस्कर महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत जिसकावून घेत कमरेवर असलेले पिशवीवर डल्ला मारत पिशवीत असलेले 10 हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून घेत कार परत माघारी वळवीत बसलेल्या त्या ठिकाणी गाडीतून उतर नाहीतर नाहीतर तुला गोळ्या घालीन अशी धमकी देऊन उतरवले या महिलेच्या तक्रारीवरून कर्जत पोलीस ठाणे अपराध क्रमांक 269/2025 bns-2023 चे कलम 309/4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा तपास पोलीस सहाय्यक निरीक्षक रमीज मुलानी हे करीत आहेत.
या घटनेची माहिती पोलीस निरीक्षक श्री दौलतराव जाधव यांना मिळताच त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस निरीक्षक रमीज मुलानी हे करीत आहे. घटनेची माहिती कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री दौलतराव जाधव यांना मिळताच त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून सपोनी रमीझ मुलानी, पो कॉन्स्टेबल बोराडे, देवकाते, दंदाडे, तसेच राशीन दूरक्षेत्र चे पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब मुळीक, पोलीस कॉन्स्टेबल पोकळे यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. फिर्यादी महिलेची सखोल चौकशी व विचारपूस करून सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा तातडीने शोध घेण्याबाबत डीबी पथकाचे अधिकारी व पोलीस स्टॉप यांना दिला
त्याप्रमाणे डीबी पथकाने परिसरातील तसेच खेड व भिगवन येथील सीसीटीव्ही फुटेज तपासून तसेच इतर प्रकारे कौशल्यपूर्ण तपास करून पुण्यातील कार निष्पन्न करून यातील आरोपी प्रफुल्ल प्रकाश पानसरे वय 29 वर्ष या. पंचशील नगर पाटस तालुका दौंड जिल्हा पुणे निष्पन्न करून त्या सापळा रुचून मौजे वरवंड तालुका दौंड जिल्हा पुणे येथून सीताफिने ताब्यात घेण्यात आले असून त्यास पुण्यात अटक करण्यात आली आहे. त्यास दिनांक 1/4/2025. रोजी माननीय न्यायालयात हजर केले असता 05 दिवस पोलीस कोठडी मिळाली असून पुढील तपास सपोनी रमीझ मुलानी हे करत आहेत सदर कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे साहेब यांच्या मार्गदर्शनात श्री उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग श्री विवेकानंद वाखारे, पोलीस निरीक्षक श्री दौलतराव जाधव, यांच्या नेतृत्वात डीबी पदकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमीझ मुलानी, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत देवकाते, किरण बोराडे योगराज सोनवणे, प्रकाश दंदाडे, यांनी केली असून मोबाईल सेल दक्षिण विभागाचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुंडू ,नितीन शिंदे ,ज्योती काळे ,यांचे मोलाचे सहकार्य लाभले या सर्वांनी केलेल्या तत्पर कारवाईबाबत तालुक्याचे नेते श्री शहाजीराजे राजे भोसले यांनी संपूर्ण पोलीस पथकाचा सत्कार राजेवस्ती येथे काल्याच्या कीर्तना दरम्यान केला असून 24 तासाच्या आत आरोपीच्या मुस्क्या बांधून छडा लावणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यानी केलेल्या तत्पर कारवाईबाबत शहाजीराजे राजे भोसले यांनी आभार मानले.