३७ वर्षांनंतर माजी विद्यार्थ्यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा !
मिरजगावात भारत विद्यालयाच्या १९८९ मधील दहावी बॅचचा स्नेहमेळावा उत्साहात


मिरजगाव ता.१७ : कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील हिंद सेवा मंडळाच्या भारत विद्यालयामधील इयत्ता दहावीतील सन.१९८९ मधील बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा तब्बल ३७ वर्षांनंतर एकत्र येऊन जुन्या आठवणींना उजाळा देत स्नेहमेळावा गेट टू- गेदर उत्साहात आणि भारलेल्या वातावरणात रविवारी १६ नोव्हेंबर रोजी पार पडला.
भारत विद्यालयाच्या प्रांगणात पार पडलेल्या या सोहळ्यासाठी विद्यालयाच्या तब्बल ६० माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी हजेरी लावली होती. ३७ वर्षापूर्वी एकत्रित शिकत असलेल्या या विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा शाळा भरली. माजी विद्यार्थी अनेक वर्षांनंतर एकत्र आल्याने वर्गमित्र आपुलकीने एकमेकांची विचारपूस करत होते.
वय पन्नाशी ओलांडलेल्या विद्यार्थ्यांनी त्याकाळी बाकावरच्या मित्र मैत्रिणींसोबत जुन्या आठवणी सांगत त्यांनी शाळेमधील एक वर्ग भरून जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी प्रत्येकाच्या मनात भावनांचा पूर उसळला होता. शाळा या दोन अक्षरी शब्दात किती मोठ विश्व सामावले याची जाणीव खरतर आपल्याला शाळा सोडून काही वर्ष झाल्यावर होते.

शाळेचे दिवस खरच खूप भारी असतात. शाळेतील प्रेम मित्र सोबत केलेली मस्ती मैदानावरची खेळ, सरांचे बोलणे, तास चालू असताना केलेली बडबड सगळे आठवत आता शाळेचे दिवस परत येत नाहीत. शाळा सोडल्यानंतर ही हीच शाळा शाळेतील शिक्षक आणि शाळेच्या आठवणी आयुष्यभर अनेकांच्या आठवणीत असतात. काहीजण मग विद्यार्थी मेळाव्याच्या माध्यमातून या आठवणी जिवंत ठेवतात. असाच एक प्रकार मिरजगावमधील भारत विद्यालयात पाहावयाला मिळाला. या ठिकाणी जुन्या मित्र मैत्रिणींचा पुन्हा एकत्र येण्याचा यावेळी सोहळा रंगला.
यासाठी मुंबई, नगर, पुणे, जळगाव, नाशिक येथून आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता.
ढोल ताशांच्या गजरात वाजतगाजत उपस्थित वर्ग मित्रांना फेटे बांधण्यात आले. तर यावेळी गुरूजनांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान हिंद सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष विद्यालयाचे चेअरमन डॉ.रमेशचंद्र झरकर यांनी भूषविले. प्रथमता दीपप्रज्वलन करून क्रांतीसूर्य सावित्रीबाई फुले व सरस्वतीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीताचे गायन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
विद्यार्थी मेळाव्यात विद्यालयातील आनंददायी क्षण, मैत्री आणि शिक्षकांचे मार्गदर्शन अशा सर्वच गोष्टींना सर्वांनी उजाळा दिला. वाढत्या वयाचा दाखला देत माजी विद्यार्थ्यांनी जीवनातील मिळविलेल्या यशाबद्दल व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवरासमोर उलगडा दिला. यावेळी व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तर विद्यार्थ्यांनी सुद्धा आस्थेने आपल्या गुरुंची चौकशी केली. शालेय जीवनातील त्या गोड आठवणी मनाला स्पर्श करत शाळेतील जुन्या आठवणीने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसाडून वाहत होता.
या भेटीदरम्यान सर्वांमध्ये हास्यकल्लोळ, कुमारवयातील गप्पा टप्पा, संगीत खुर्ची स्पर्धेचा खेळ चांगलाच रंगला होता. जुन्या आठवणींना सर्वांनी उजाळा देत स्नेह भोजनांचा आनंद लुटला. अशा भेटी वारंवार व्हाव्यात असा संकल्प उपस्थित सर्व वर्गमित्रांनी एकमेकांत ठरवला.

या विद्यार्थी स्नेहमेळाव्यासाठी सेवानिवृत्त शिक्षक देविदास राऊत, काशिनाथ मुरकुटे, सर्जेराव बावडकर, एल.डी खेडकर, डिके खेतमाळस, तरंगे सर, सातव सर, भागवत चव्हाण, मुख्याध्यापक खुरांगे सर, यांच्यासह विद्यालयातील माजी विद्यार्थी गुलाब तनपुरे, संपत बावडकर, अन्सार तांबोळी, राजू सय्यद, दिलीप कोल्हे, सोमनाथ बनकर, प्रवीण कोठारी, बापूशेठ कासवा, मोहम्मद पठाण, प्रशांत शहा, दत्तात्रय तुपे, विजय अडसूळ, जमीर सय्यद, सुनिल गोरे, देविदास बाबर, सुदाम कोरडे, महादेव गवारे, संभाजी काळंगे, नामदेव गायकवाड, शामराव दळवी, विलास दळवी, रामदास ससाणे, राजू पठाण, दत्ता दळवी, राजू तरटे, संजय पोकळे, संजय खिळे, भाऊसाहेब वाडगे, अनिल तनपुरे, मकसुद सय्यद, राजेंद्र तनपुरे, लक्ष्मण दळवी, सुरेश सातव, रामा म्हेत्रे, सादिक पठाण, दिपक बागडे, मधुकर कोरडे, दिनेश भंडारी, बबन घोडके, सुनिल चव्हाण, रघुनाथ निकम, विजय शिंदे, बाळासाहेब अडसूळ, राजेंद्र बगाडे, ज्ञानेश्वर क्षिरसागर, सतिश थेटे, बापू ढोले, वसंत सुपेकर, संतोष जगताप, दत्ता बोरुडे, संजय म्हेत्रे, हनुमंत गोरे, संजीव कोल्हे, माधुरी झरकर, अर्चना आळंदे, अनिता पाखरे, लता घोडके, संध्या गुंदेचा, संगिता डहाळे, सरिता बोगावत, संगीता गुंजाळ, भारती कुलकर्णी, शालन बनकर आदींसह विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मेळाव्यात शाळेला आर्थिक मदतीचा हात देण्याचा निर्णय घेण्यात आला. अशा या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने सर्वांच्या मनात नात्याची उब पुन्हा जागवली, आणि जुने दिवस नव्याने अनुभवण्याचा एक अविस्मरणीय क्षण देऊन गेला अशी भावना प्रत्येक माजी विद्यार्थ्यांनी यावेळी व्यक्त केली. आभार माधुरी झरकर यांनी मानले.
अन् अनुभवाची शिदोरी उलगडली !
विद्यार्थी व उपस्थितांनी आपापल्या जीवनातील प्रसंगासह जीवन प्रवास थोडक्यात कथन करत शालेय जीवनात व आयुष्यात आलेल्या अनुभवाची शिदोरी उलगडली.शालेय जुन्या आठवणी, बालमित्रांच्या गंमतीजमती, शिक्षकांचे मार्गदर्शन यांचे सूर जणू पुन्हा एकदा हृदयात गुंजले. गप्पागोष्टी, फोटोसेशन अन् हास्यविनोदांनी दिवस कसा गेला ते कळलेही नाही.



