pub-1628281367759110
Advertisement
आरोग्य व शिक्षणई-पेपरकृषीवार्तागुन्हेगारीब्रेकिंग

कर्जत : तहसीलदार रवी सतवन यांचा पदभार; भाजप नेतृत्त्वाकडून सत्कार, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गंभीर चर्चा

Samrudhakarjat
4 4 3 2 4 5

कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत तालुक्याच्या महसूल प्रशासनात आज महत्त्वाचा बदल झाला. अनुभवी अधिकारी गुरू बिराजदार यांची उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाल्यानंतर, त्यांच्या जागी रवी सतवन यांनी कर्जत तालुक्याचे नवे तहसीलदार म्हणून सोमवार, दिनांक १७ नोव्हेंबर २०२५ रोजी औपचारिकरित्या पदभार स्विकारला. भाजप पदाधिकाऱ्यांकडून सत्कार नवीन तहसीलदारांच्या स्वागतासाठी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला.

या सत्कार सोहळ्यात— उदयसिंग राजपूत, भाजपा किसान मोर्चा सरचिटणीस,अशोक खेडकर, माजी जिल्हा परिषद सदस्य,संतोष निंबाळकर, भाजपा तालुका सरचिटणीस,अशोक कदम, भाजपा तालुका उपाध्यक्ष आदी मान्यवरांनी रवी सतवन यांना पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. पदभार स्विकारल्यानंतर तहसीलदारांनी सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारत कर्जत तालुक्याच्या विकासासाठी कार्य करण्याचा विश्वास व्यक्त केला.

सत्कारानंतर झालेल्या चर्चेदरम्यान कर्जत तालुक्यातील शेतकरी प्रश्नांवर विशेष भर देण्यात आले. गेल्या काही महिन्यांपासून कर्जत तालुक्यात अतिवृष्टी, गारपीट, अनियमित पाऊस व कीडरोगांमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक शेतकरी अद्यापही शासकीय मदतीची वाट पाहत आहेत.

या संदर्भात उदयसिंग राजपूत यांनी तहसीलदारांना सांगितले की “ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झाले असूनही मदत मिळालेली नाही, त्यांना तातडीने सहाय्य मिळेल याची खात्री करावी. तसेच जे शेतकरी काही कारणांनी यादीतून राहिले आहेत, त्यांचा पुनर्विचार करून मदत देण्यात यावी. एकही पात्र शेतकरी वंचित राहू नये हीच अपेक्षा आहे.”

राजपूत यांनी पुढे सांगितले की, भाजपा किसान मोर्चा शेतकऱ्यांसोबत उभा असून तालुक्यातील विविध समस्या तहसीलदारांच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचवण्यात येतील. 

“शेतकऱ्यांना न्याय मिळेल” या मागणीवर प्रतिसाद देताना तहसीलदार रवी सतवन यांनी आश्वासन दिले की: महसूल विभागाच्या सर्व प्रलंबित प्रकरणांचा तातडीने आढावा घेतला जाईल, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीत गती येण्यासाठी यंत्रणा अधिक कार्यक्षम केली जाईल, तसेच प्रशासनाकडून पारदर्शक व शेतकरीहिताचे निर्णय घेतले जातील.

रवी सतवन हे शांत, अभ्यासू आणि कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नियुक्तीमुळे तालुक्यातील शेतकरी, नागरीक आणि स्थानिक नेतृत्त्वामध्ये नवीन अपेक्षांचा संचार झाला आहे. महसूल संबंधित प्रलंबित प्रकरणे, जमीन नोंदणी, वारस नोंद, शेतकरी नुकसान भरपाई, परवानग्या अशा अनेक क्षेत्रात प्रशासनिक गती येईल, अशी अपेक्षा आहे.

कर्जत तालुक्यातील स्थानिक राजकीय आणि सामाजिक वर्तुळात नवीन तहसीलदारांच्या आगमनाची दखल घेतली जात असून पुढील काही दिवसांत ते विविध विभागांचा आढावा घेणार असल्याची माहिती मिळाली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
pub-1628281367759110

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker