मराठा महासंघाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी अजित मोढळे यांची निवड राशिन मध्ये मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने सत्कार.


(राशीन प्रतिनिधी जावेद काझी.) :- कर्जत तालुक्यातील राशीन नजीक देशमुखवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते मधुकर दंडे पाटील यांची भारतीय मराठा महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी तसेच पैलवान अजित मोढळे यांची महासंघाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. मुंबई येथे संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अप्पासाहेब आहेर पाटील व राष्ट्रीय कार्याध्यक्ष मनोहर सुगदरे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी भारतीय मराठा महासंघाचे राजन गावंडे, महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष श्रेयाताई तटकरे,

महाराष्ट्र कार्याध्यक्ष राम शिंदे, इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडीनंतर जिल्हाध्यक्ष मधुकर दंडे व जिल्हा कार्याध्यक्ष अजित मोढळे, उपस्थित पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. निवड घोषित होताच राशीन येथील मुस्लिम समाज बांधव यांच्यावतीने राजेबाग सवार दर्ग्यावर नूतन जिल्हा कार्याध्यक्ष पैलवान अजित मोढळे यांचा फेटा बांधून शाल श्रीफळ देऊन पुढील कार्यास शुभेच्छा देत सत्कार करण्यात आला. यावेळी दर्ग्याचे मुजावर ताजुद्दीन काझी, नामांकित फोर व्हीलर फिटर अल्ताफ सय्यद,सलीम शेख, लतीफ पठाण, गफ्फार कुरेशी, इतर ग्रामस्थ उपस्थित होते.




