आष्टी तालुक्यातील इंदापूरला निघालेली महिला 2 लहान मुलांसह तीन दिवसांपासून बेपत्ता


आष्टी पोलीस ठाण्यात भावाने दिलेल्या तक्रारीनुसार त्याची बहीण दोन लहान मुलांसह गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
तक्रारीनुसार, चंद्रकांत आप्पा भोगाडे (वय 29, रा. पांढरी, ता. आष्टी, जि. बीड) यांनी पोलीस ठाणे आष्टी येथे हजर राहून तोंडी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची बहीण चंद्रकला संदीप सपकळ (वय 33 वर्षे, रा. कळासी, ता. इंदापूर, जि. पुणे) ही गेल्या आठ दिवसांपासून माहेरी पांढरी येथे आली होती.

11 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता ती सासरी कळासी येथे जाण्यासाठी निघाली होती. तिची आई पारूबाई भोगाडे यांनी तिला आष्टी बसस्थानकावर जाण्यासाठी रिक्षामध्ये बसवून पाठविले होते. मात्र त्यानंतर ती घरी सासरी पोहोचली नाही.
तिच्या मोबाईल क्रमांकावर (मो. 9206058484) वारंवार संपर्क साधला असता फोन बंद असल्याचे लक्षात आले. याबाबत तिचे पती संदीप सपकळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी देखील तिच्याशी संपर्क होत नसल्याची माहिती दिली. दिवसभर कुटुंबीय व नातेवाईकांनी चौकशी केली असता कुणाकडेही ती व तिची दोन मुलं दिसून आली नसल्याचे समोर आले.
तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार चंद्रकला ही थोडीशी मनोरुग्ण असल्याचे सांगण्यात आले आहे.

बेपत्ता व्यक्तींचे वर्णन — १) चंद्रकला संदीप सपकळ वय : ३३ वर्षे रा. कळासी, ता. इंदापूर, जि. पुणे वर्ण : गव्हाळ चेहरा : गोल उंची : ५ फूट शरीरयष्टी : सडपातळ, कपडे : हिरव्या रंगाचा ब्लाऊज व साडी, गळ्यात मणी-मंगळसूत्र, नाकात मोरणी, हातात गोट भाषा : मराठी,
१) रेवन (वय ३ वर्षे) २) साई (वय १ वर्ष ६ महिने) दोन्ही मुले चंद्रकला यांच्यासोबत असून त्यांचाही ठावठिकाणा लागत नाही.

शोधासाठी आवाहन चंद्रकांत भोगाडे यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनानुसार, बहिण व दोन लहान मुलांचा सर्वत्र शोध घेतला असता ते मिळून आले नाहीत. आपणा कोणासही महिला व दोन मुले आढळून आल्यास किंवा मिळाल्यास ती माहिती त्वरित आष्टी पोलीस ठाण्याशी द्यावी किंवा त्यांचे पती संदीप सपकाळ यांना 9657095297, तसेच त्यांचे दीर सागर सपकाळ 7756003037 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांच्या कुटुंबाने केले आहे.

ही नोंद तक्रारदार यांच्या सांगण्याप्रमाणे संगणकावर टंकलिखित करण्यात आली असून त्यांनी ती वाचून तपासून खरी असल्याचे सांगितले आहे.



