pub-1628281367759110
Advertisement
ब्रेकिंग

जगदंबा विद्यालयाच्या वतीने पत्रकार बांधवांचा तसेच वनसंरक्षक पदी निवड झालेल्या मोहसीन शेख यांचा सन्मान सोहळा संपन्न…

Samrudhakarjat
4 5 5 5 3 6

राशीन प्रतिनिधी जावेद काझी. रयत शिक्षण संस्थेचे श्री जगदंबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राशीन च्या वतीने समृद्ध कर्जत पोर्टल चे पत्रकार जावेद काझी, सकाळ चे पत्रकार दत्ता उकिरडे , पुढारी चे पत्रकार किशोर कांबळे, लोकमतचे पत्रकार महादेव सायकर, प्रभात चे पत्रकार, विश्वास रेणुकर, दै. नवराष्ट्रचे पत्रकार विशाल रेणुकर या सर्व पत्रकारांचा तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत श्री जगदंबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे माजी विद्यार्थी मोहसीन जब्बार शेख यांची सहाय्यक वनसंरक्षक वर्ग १ पदी निवड झाल्याबद्दल मोहसीन शेखचा व उपस्थित पत्रकार बांधवांचा विद्यालयाच्या वतीने उपमुख्याध्यापक राक्षे साहेब व इतर शिक्षकांच्या हस्ते

शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ, देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक राक्षे साहेब, बाबर सर, चव्हाण सर, दळवी सर, काळे सर, पवार सर, मुंढे सर, व इतर शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्तावित विकी साळवे सर यांनी केले तर आभार भगवान शिंदे सर यांनी मानले.

 

1/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
pub-1628281367759110

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker