भारतीय इतिहासातील पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका फातिमा शेख यांची जयंती जि.प.प्रा.उर्दू शाळा राशीन येथे उत्साहात साजरी.


(राशीन प्रतिनिधी जावेद काझी.) :- जगाच्या पाठीवर अग्रेसर असलेले भारत देशाची पहिली मुस्लिम महिला शिक्षिका फातिमा शेख यांची जयंती शुक्रवार दिनांक.9/1/2026. रोजी शालेय विद्यार्थी विद्यार्थिनीच्या व पालक महिलांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
भारतीय इतिहासातील थोर समाजसेविका सावित्रीबाई फुले यांच्या सहकारनी ज्यांनी मुलींच्या शिक्षणाचा प्रथम पाया उभा केला अशा महान तपस्वी महापुरुषनी सोबत शिक्षणाच्या कार्याला धैर्य व पाठबळ देणाऱ्या जिथे जात ,पात, धर्मनिष्ठा व स्वतःचेच कौटुंबिक सुख न उपभोक्ता केवळ शिक्षणाचे महत्व पटवून देत ज्ञानाचा तेजस्वी प्रकाश माता भगिनी पर्यंत पोचवला. अशा थोर भारतीय पहिल्या महिला शिक्षिका यांच्या जयंतीनिमित्त उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिका साचे समीनाबानो यांच्यावतीने थोर महापुरुषांचे फोटो शाळेत लावण्यासाठी स्वखर्चातून रू .५७६० किमतीचे १८, फोटो शाळेस भेट स्वरूपात देण्यात आले.

याप्रसंगीमहिला पालक मेळावा घेण्यात आला. यावेळी आसिफा काझी, फरजाना काझी, हलीमा सय्यद, खैरूनिसा काझी, हमिदाबाजी शेख , आयेशा काझी, मिनाज काझी, अस्मा काझी, सोफिया काझी, हिना काझी, दिलशाद काझी, मिनाज काझी,व शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी पालक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते…




