

कर्जत (प्रतिनिधी):- माणूस जन्माला येतो तेव्हा आनंद साजरा होतो, पण आयुष्याच्या अखेरच्या प्रवासात जिथे विसावतो, त्या स्मशानभूमीकडे सहसा कोणाचे लक्ष जात नाही. मात्र, विधानपरिषद सभापती राम शिदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कर्जत ग्रामपंचायत काळापासुन दुर्लक्षित राहिलेली कर्जत नगरपंचायत हद्दीतील कोरेगाव रोड स्मशानभूमी परिसरात एक अत्यंत हृदयस्पर्शी आणि विधायक उपक्रम राबवण्यात आला. येथे लावलेल्या लहान रोपट्यांच्या संरक्षणासाठी बाधकाम समिती सभापती भास्कर भैलुमे यांच्या संकल्पनेतुन ‘ट्री गार्ड’ बसवून निसर्गाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली…

स्मशानभूमी म्हणजे दु:ख आणि विरक्तीचे ठिकाण. पण याच ठिकाणी शांतता आणि सावली मिळावी म्हणून काही दिवसांपूर्वी वृक्षारोपण करण्यात आले होते. ही कोवळी रोपटी जगवणे मोठे आव्हान होते. सभापतीं राम शिदे
याच्या वाढदिवसाचे निमित्त साधून, हार-तुरे आणि अवाजवी खर्च टाळून बांधकाम समितीचे सभापती भास्कर भैलुमे यांनी रोपट्यांना लोखंडी जाळ्यांचे (ट्री गार्ड) संरक्षक कवच दिले.

यावेळी माजी जि प सदस्य व भाजपा जेष्ठ नेते प्रविण घुले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगीतले की गेली अनेक वर्षपासुन दुर्लक्षित राहिलेल्या
स्मशानभूमीसारख्या ठिकाणी हिरवळ फुलवण्याचा हा प्रयत्न खऱ्या अर्थाने माणुसकी आणि निसर्गप्रेमाचे दर्शन घडवणारा ठरला.
कर्जत कोरेगाव रोडवरील या स्मशानभूमीचा कायापालट करण्यासाठी उचललेले हे पाऊल शहरात चर्चेचा विषय ठरले आहे. यावेळी बोलताना भाजपाचे तालुकाध्यक्ष अनिल गदादे यानी बोलताना सांगीतले कि भास्कर भैलुमे बाधकाम समिती सभापती यांनी विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त केवळ घोषणा न देता, प्रत्यक्ष कृतीतून दिलेली ही भेट कायमस्वरूपी स्मरणात राहणारी आहे…

“स्मशानभूमीत येणाऱ्या प्रत्येकाला उद्या या झाडांची सावली मिळेल, हेच आमच्या लाडक्या नेत्याला दिलेले सर्वात मोठे गिफ्ट आहे.” अशी भावना सर्व नगरसेवक नगरसेविका यांनी व्यक्त केली.
यावेळी जि प सदस्य भाजपा नेते प्रविण घुले संतोष (आप्पा) मेहेञे उपनगराध्यक्ष मंडल (अध्यक्ष) अनिल गदादे भाजपा युवा नेते सचिन घुले शहराध्यक्ष अमोल भगत विनोद दळवी

रवी सुपेकर देविदास खरात किरण भैलुमे सागर शिदे ओंकार खराडे अदी मान्यवर उपस्थित होते..




