राशीन येथे हशु आडवाणी विद्यालयाच्या वतीने पत्रकार बांधवांचा सत्कार.


(राशीन प्रतिनिधी जावेद काझी.) प्रथमताआचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करीत मराठी पत्रकार दिनानिमित्त राशीन शहरातील लोकशाहीच्या चौथ्या स्तंबाचे जनक शिलेदार असणाऱ्या पत्रकार बांधवांचा सत्कार हशु अडवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष, मा. सरपंच ज्येष्ठ नेते अल्लाउद्दीन काझी , युवा नेतृत्व साहिल काझी व शिक्षकांच्या वतीने सकाळ चे पत्रकार दत्ता उकिरडे, लोकमत चे पत्रकार महादेव सायकर, प्रभात चे पत्रकार विश्वास क्षीरसागर, साप्ताहिक समृद्ध कर्जत न्यूज पोर्टल लाईव्ह चे पत्रकार जावेद काझी या सर्व पत्रकार बांधवांचा शाल ,श्रीफळ, पुष्पगुच्छ, देऊन व भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळीविद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र नष्टे अजिनाथ शिंदे सर, यशवंत देशमुख सर, मनोहर भारती सर, सतीश शिंदे सर, महेश गवळी सर, मुस्ताक शेख सर, शिपाई सोमनाथ काळे.व. इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




