कर्जत पोलीस स्टेशनतर्फे ‘रन फॉर युनिटी’ स्पर्धेचे आयोजन सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त विविध स्तरांतील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग


कर्जत | प्रतिनिधी आज दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी, सकाळी 7.30 ते 8.30 वाजेच्या सुमारास, कर्जत पोलीस स्टेशनतर्फे ‘राष्ट्रीय एकता दिवस’ तसेच ‘सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त’ एकता दौड अर्थात ‘रन फॉर युनिटी’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात कर्जत पोलीस स्टेशन येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर पोलीस स्टेशन–अण्णाभाऊ साठे चौक – महात्मा फुले चौक – मसोबा गेट–कापरेवाडी वेस–काकडे हॉस्पिटल–बाजार तळ–मेन रोड–छत्रपती शिवाजी महाराज चौक–छत्रपती संभाजी महाराज चौक–कर्जत पोलीस स्टेशन असा मार्ग घेत ‘रन फॉर युनिटी’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

या स्पर्धेत मा. उपविभागीय पोलीस अधिकारी लोखंडे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी गुरु बिराजदार नगरपंचायतचे मुख्य अधिकारी अक्षय जायभाय, दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य संजय नगरकर रोटरी क्लबचे अध्यक्ष राऊत तसेच रोटरी क्लब सदस्य, पत्रकार, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कर्जत पोलीस स्टेशनचा संपूर्ण कर्मचारीवर्ग व दादा पाटील महाविद्यालयातील विद्यार्थी यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.
या उपक्रमात सुमारे 250 ते 300 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला, ज्यामुळे कर्जत शहरात एकतेचा आणि देशभक्तीचा संदेश पोहोचला.
कार्यक्रमाची सांगता कर्जत पोलीस स्टेशन येथे राष्ट्रगीताने करण्यात आली. या उपक्रमाद्वारे समाजातील सर्व घटकांना राष्ट्रीय एकात्मतेचा आणि ऐक्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला.




