शिवसेना बांधकाम कामगार जिल्हा उपप्रमुख अंबादास जाधव यांच्या विशेष प्रयत्नातुन अंबालिका कारखाना बारडगाव येथे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन.


राशिन प्रतिनिधी जावेद काझी. राशीन येथील श्री अंबादास भगवान जाधव जिल्हा उपप्रमुख शिवसेना बांधकाम कामगार सेना शिंदे गट अहिल्यानगर यांच्या विशेष प्रयत्नातून दिनांक 3/ 11 /2025 रोजी अंबालिका कारखाना बारडगाव तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर बांधकाम कामगार प्रशिक्षण शिबिरासाठी बांधकाम कामगार योजनेतील दोनशे लाभार्थ्यांना प्रशिक्षण व उत्तम मार्गदर्शन करण्यात आले त्याचबरोबर चार हजार दोनशे रुपये भत्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर लवकरच वर्ग करण्याचे निर्देश वरिष्ठ कार्यालयाला सादर करण्यात आले .त्यावेळी सर्व लाभार्थी महाराष्ट्र राज्याचे लाडके उप मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ,

महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष प्रीतम धारिया , कार्यकारी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य तथा पुणे जिल्हा अध्यक्ष संतोषजी राजपूत जिल्हा उपप्रमुख अंबादास जाधव तसेच सौ. मनीषा पारके व मा. ग्रामपंचायत सदस्या सौ.सारिका अमोल जाधव तसेच मा.ग्रामपंचायत सदस्य अतुल साळवे मातंग एकता आंदोलनाचे नेते महेशजी उकिरडे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत शिबिर व प्रशिक्षण कार्यक्रम व्यवस्थित रित्या संपन्न झाला.



