माननीय नामदार प्रा राम शिंदे यांच्या प्रेरणेतून भोसेकरांनी मैत्री गृपच्या माध्यमातून अनुभवला क्रिकेटचा थरार……..


सभापती महोदय नामदार प्रा राम शिंदे यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाखाली मैत्री गृपच्या माध्यमातून क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करणेत आले होते . काल दि .19/11/2025 रोजी स्पर्धेचा अंतिम दिवस होता . बक्षिस वितरणासाठी प्रा राम शिंदे यांच्या वतीने शेखर खरमरे संघटन सरचिटणीस भाजपा, श्री नरसिंग पवार गुरुजी, वाल्मिक साबळे, सुदर्शन कोपनर, सतिष सुद्रिक संचालक खरेदी विक्री संघ कर्जत तसेच प्रा राम शिंदे यांचा संदेश घेऊन त्यांचे स्विय सहाय्यक रोहीत ढेरे उपस्थित होते .भाजप पदाधिकार्यां बरोबरच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते राजेंद्र गुंड हेही उपस्थित होते …..

भोसे सारख्या खेड्यात एवढ्या मोठ्या स्पर्धेचे आयोजन करून ग्रामीण भागातील असलेले गुणवत्ता जगासमोर आणणे,त्याला न्याय देणे तसेच ग्रामीण भागातील मुलांना अशा स्पर्धामुळे खेळाप्रती एक वेगळी दृष्टी मिळते असा दृष्टिकोन यामागे आहे . अशा स्पर्धांच्या आयोजनातून ग्रामीण खेळांडूना एक व्यासपीठ मिळते आणि ग्रामीण भागातील गुणवत्तेला वाव मिळतो असे प्रतिपादन सभापती महोदय प्रा राम शिंदे यांनी दिलेल्या संदेशात म्हटले आहे …

प्रथम बक्षीस श्रीगोंदा द्वितीय बक्षीस मैत्री चषक भोसे तृतीय बक्षीस मांडवगण फराटा आयोजक श्री प्रवीण चव्हाण मैत्री चषक क्रिकेट क्लब अध्यक्ष श्री बालम भाई शेख मैत्री क्रिकेट क्लब उपाध्यक्ष श्री नानासाहेब शिंदे जितेंद्र चव्हाण श्रीकांत भोसले ग्रामस्थ दादासाहेब खराडे दत्तात्रय खराडे धनराज खराडे आप्पासाहेब शिरसागर प्रदीप खराडे हापायर जितेंद्र रणपिसे बापूराव भोईटे कॉमेंट्री श्री मनीष काळे यांनी काम पाहिले.




