राशीन मुख्य बाजारपेठेतील एटीएम मशीनची नासधूस कारण अध्याप गुलदस्त्यात?


राशीन प्रतिनिधी जावेद काझी. राशीन येथील मुख्य बाजार बाजारपेठेतील दौंड -धाराशिव राज्य मार्ग रस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराज चौका शेजारील पंथ थोरात यांच्या दुकानात हिटाची कंपनीचे एटीएम मशीन सोबत नेमका अंदाजे आज मध्यरात्रीच्या सुमारास काही प्रकार घडला आहे. अद्याप तरी काही समजू शकलेली नाही. येणाऱ्या जाणाऱ्या रहिवाशांच्या व नागरिकांच्या मते एटीएम साठी विद्युत कनेक्शन रस्त्याच्या समोरील खांबावरून घेतलेली असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांमुळे किंवा उसाच्या उंच ट्रॅक्टर ट्रॉलीमुळे हा प्रकार झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. परंतु सत्य परिस्थिती नेमकी काय आहे.

अध्याप तरी कळू शकले नाही एटीएम बाबत ग्राहकांना पैसे काढण्यास तांत्रिक अडचण आल्यास मदत साठी संपर्क करणाऱ्या व्यक्तीचा फोन देखील लागत नसल्यामुळे एटीएम मशीन मधील पैसे शाबित आहेत की नाही याबाबत अद्याप काही समजले नाही .नेमका प्रकार अद्याप तरी गुलदस्त्यात आहे.




