google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

सोलर पंप चुकीचे बसविल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान; मोटर बदलून देण्याची मागणी

Samrudhakarjat
4 8 2 8 6 9

शिंदे (ता. कर्जत) – सौर ऊर्जा प्रकल्पांतर्गत शेतकरी बबन रामदास घालमे (रा. शिंदे, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) यांचे सोलर पंप MT 4421300402848 या क्रमांकाचा मोटर चुकीने बसविण्यात आल्यामुळे सिंचन व्यवस्थेवर परिणाम होऊन शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे. याबाबत बबन रामदास घालमे यांनी केली आहे उर्जा विभाग तसेच एम.एस.ई.बी. कंपनीकडे तातडीने योग्य मोटर बसविण्याची मागणी केली आहे.

अर्जात नमूद केल्याप्रमाणे, कंपनीने बसविलेली मोटर कमी क्षमतेची असून ती पाण्याचा दाब आवश्यक तेवढा देऊ शकत नाही. त्यामुळे विहिरीतील पाणी वर येत नसल्याने शेतीला पाण्याचा पुरवठा होत नाही. यामुळे पिके वाळण्याची वेळ आली असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कंपनीकडे दिलेल्या अनेक तक्रारी व पाठपुराव्यानंतरही कोणतीही दखल न घेतल्याचा आरोप अर्जदार बबन रामदास घालमे यांनी या निवेदनात केला आहे.

२४/११/२०२५ रोजी दिलेल्या या निवेदनात, चुकीची मोटर बदलून द्यावी व सिंचनासाठी आवश्यक क्षमतेची मोटर तात्काळ बसवावी, संबंधित अधिकारी व एम.एस.ई.बी. कंपनीने याकडे तातडीने लक्ष देऊन शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.

1/5 - (2 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker