pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

आनंदी बाजार व डॉ.सौ.सुषमा बरबडे यांचा सन्मान संपन्न

Samrudhakarjat
4 6 3 0 9 6

कर्जत – आपला आवडता छंद, मनात असलेली जिद्द आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे घरातून आपल्याच माणसांकडून मिळालेली “प्रेरणा’ या सर्व गोष्टींमुळे एक महिला हे शिखर अगदी लीलया पार पाडू शकली. या सर्व गुणांच्या बळावर महिला कोणतेही कार्य करण्यास सक्षम बनते. हे मोलाचे विचार, बर्गेवाडी गावचे भूषण डॉ. सौ. सुषमा दादासाहेब बरबडे यांनी विद्यार्थ्यांसमोर व्यक्त केले.

   जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बर्गेवाडी येथील विद्यार्थ्यांच्या आनंदी बाजार उद्घाटन प्रसंगी झालेल्या सत्काराला उत्तर देताना बोलत होत्या.

          या आनंदी बाजाराचे औचित्य साधून शाळेचे भूषण आणि शाळेला नेहमी सहकार्य करणारे माजी विद्यार्थी डॉ.श्री. दादासाहेब बरबडे यांच्या सौभाग्यवती डॉ. सौ. सुषमा बरबडे यांनी हिमालयातील माउंट रेनॉक १६५०० फूट उंचीचे शिखर यशस्वीरित्या सर करून बर्गेवाडी गावाचे नाव राष्ट्रीय पातळीवर कोरले आहे. त्यानिमित्ताने वार -शनिवार दिनांक २९/११/२०२५ रोजी जि.प. शाळेत सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. याप्रसंगी प्रा. डॉ. रामदास ढगे यांनी शालेय विद्यार्थ्यांना या वयापासूनच ध्येय, जिद्द, आवड, आत्मविश्वास आणि व्यवहार ज्ञान होऊन अशीच एखादी प्रेरणा मिळावी व एक उत्कृष्ट भावी नागरिक तयार व्हावा या उद्देशाने अशा कार्यक्रमांचे आयोजन करणे गरजेचे आहे. असे मत आपल्या उत्कृष्टशैली मधून अगदी सहजगत्या व्यक्त केले. 

  यावेळी गावातील नगरसेवक श्री. पिसाळ साहेब, श्री. कृष्णा पिसाळ, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. संदीप पठाडे, श्री दत्ता सुरवसे, श्री. परशुराम होगले साहेब, बर्गेवाडीतील नागरिक व पालक आनंदी बाजार व सत्कार समारंभासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बालगोपाळांचा आनंद द्विगुणीत केला. आनंदी बाजारासाठी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध स्टॉल लावले होते. मोठ्या उत्साही वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम.पवार मॅडम यांनी केले तर श्रीम. वारुंगुळे मॅडम यांनी आभार मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker