pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

बहिरोबावाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ. प्रियंका नितीन तोरडमल बिनविरोध…

Samrudhakarjat
4 6 5 2 9 5

कर्जत (प्रतिनिधी), : – बहिरोबावाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाची बहुप्रतिक्षित निवड गुरुवार रोजी ८ – १ – २०२६ रोजी बिनविरोध पार पडली. उपसरपंचपदी सौ. प्रियंका नितीन तोरडमल यांची निवड जाहीर होताच गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या निवडीमुळे बहिरोबावाडीच्या राजकीय व सामाजिक जीवनात नितीन तोरडमल गटाचे वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

ग्रामपंचायतीच्या सभागृहात उपसरपंचपदासाठी नियमानुसार प्रक्रिया राबविण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेविका सौ. आशा तापकीर यांनी कामकाज पाहिले. सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर सौ. प्रियंका नितीन तोरडमल यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आले.

या महत्त्वपूर्ण निवडीसाठी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच कोमल शरद यादव, माजी सरपंच विजय काका तोरडमल, शिवसेना तालुका प्रमुख डॉ. नितीन तोरडमल यांच्यासह अनेक मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते. तसेच ग्रामपंचायत सदस्य सचिन लाळगे, नवनाथ लष्कर, चंद्रकला तोरडमल, आशा तांदळे, विनोद खराडे, दिलीप यादव यांच्यासह शरद यादव, कैलास यादव, संदीप तोरडमल, सुधीर यादव, उमेश तोरडमल आदी प्रमुख कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवनिर्वाचित उपसरपंच सौ. प्रियंका तोरडमल यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना उपस्थितांनी सौ. तोरडमल यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य व इतर मूलभूत सुविधांच्या विकासकामांना अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, बहिरोबावाडीच्या सर्वांगीण विकासासाठी नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker